शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात शेतकरी आत्महत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संकटकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संकटकाळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. गतवर्षी याच कालावधीत ५०० शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. दर दोन दिवसात पाच, तर दर नऊ तासात एक शेतकरी आत्महत्या होत आहे.

कर्ज, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यात वऱ्हाडातील शेतकरी अडकला आहे. यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व घरसंसार कसा करावा, या विवंचनेत शेतकऱ्यांच्या संघर्षात नैराश्य मात करीत आहे. नापिकीच्या दृष्टचक्रात खासगी सावकारांचे कर्ज वाढत आहे. शेतीत उत्पादनखर्चही पदरी पडत नसल्याने पोशिंद्याचा धीर खचून तो मृत्यूचा घोट घेत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. कोरोनाकाळात यात अंशत: कमी आलेली आहे. अशास्थितीत जिल्हा समितीची सहा-सहा महिने बैठक होत नसल्याने प्रशासनाची याविषयी अनास्था दिसून येत आहे.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहे. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत शासनाद्वारा अनेक योजना प्राधान्याने राबविण्यात येतात. मात्र, खऱ्या व गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचत नाही. शासन व प्रशासनाद्वारा शेतकरी आत्महत्या हा विषयच मुळात गंभीरतेने घेत नसल्यामुळे शेतकरी उपेक्षित राहत असल्याचा आरोप होत आहे.

बॉक्स

सन २००१ पासून १६,८४८ शेतकरी आत्महत्या

विभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल विभागाद्वारे घेण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ८४८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये ७,५६५ प्रकरणात वारसांना शासन मदत देण्यात आलेली आहे. ८,९७३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. याशिवाय ३९० प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

बॉक्स

शेतकरी आत्महत्यांची स्थिती (जूनअखेर)

महिना २०१९ २०२० २०२१

जानेवारी ७७ ८३ ७८

फेब्रुवारी ७३ ९७ ७२

मार्च ८२ ५९ ८९

एप्रिल ७१ ५१ ६४

मे ९१ ११६ ७५

जून ८१ ९४ ८२

एकूण ४७५ ५०० ४६०