शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

संकटग्रस्त ‘काळपोट्या पराटी’ पक्ष्याची नोंद

By admin | Updated: October 26, 2015 00:35 IST

‘इंटरनॅशनल युनियन कंझर्व्हेशन आॅफ नेचर’ संघटनेने संकटग्रस्त यादीत समाविष्ट ‘काळपोट्या पराटी’ पक्ष्याची नोंद अमरावती येथील छत्री तलावावर केली.

स्टरनिडी कुळातील हा दुर्मिळ पक्षी : छत्री तलाव भागात आढळला, पक्षिप्रेमींमध्ये आनंदअमरावती : ‘इंटरनॅशनल युनियन कंझर्व्हेशन आॅफ नेचर’ संघटनेने संकटग्रस्त यादीत समाविष्ट ‘काळपोट्या पराटी’ पक्ष्याची नोंद अमरावती येथील छत्री तलावावर केली. दुर्मिळ असणारा हा पक्षी अमरावतीत आढळल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड, निसर्ग लेखक प्र.सु. हिरुरकर, वैभव दलाल, राहुल गुप्ता, धनंजय भांबुरकर, प्रफुल्ल गावंडे पाटील, सुरेश खांडेकर आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी शहरलागतच्या छत्री तलावावर पक्षी निरीक्षण केले असताना त्यांना काळपोट्या पराटी हा पक्षी आढळून आला. ‘काळपोट्या कुररी’ किंवा ‘लहान सरोता’ या नावानेदेखील ओळखला जाणारा हा पक्षी अत्यंत दुर्मिळ समजला जातो. केरळ किनारपट्टीसह मेघालय, सिक्कीम भागात हिवाळ्यात हा स्थलांतर करीत असून महाराष्ट्र पठार, माळव्याचे पठार, छोटा नागपूर पठार, गंगा-ब्रम्हपुत्रा नदीच्या खोऱ्यात याचे दर्शन होण्याची शक्यता फार धूसर असते. त्यामुळे अमरावती येथील त्याचे दुर्मिळ दर्शन पक्षिप्रेमींना आनंद देणारे ठरले. भारतात १८ प्रकारचे ‘टर्न’ पक्षी दिसत असून त्यात गिल-बिल टर्न, रिवर टर्न, लिटिल टर्न. व्हिस्करड टर्न आणि आता ब्लॅक बेलीड टर्नच्या दर्शनामुळे अमरावती जिल्ह्यात आता ५ प्रकारच्या टर्न पक्ष्यांचे दर्शन होऊ शकते. स्टरनिडी कुळातील या पक्ष्याला शास्त्रीय भाषेत ‘स्टर्ना अ‍ॅक्युटीकॉडा’ या नावाने ओळखले जाते. इंग्रजी भाषेत याला ‘ब्लॅक बेलीड टर्न’ असेही म्हणतात. हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान असून याची चोच नारिंगी रंगाची असते. शेपूट लांब व टोकदार बाणासारखे असून शेपटी व पोटाखालचा भाग काळा असतो. डोक्याचा वरचा भाग काळा असून पंखावर पांढऱ्या रेषा असतात. गाल आणि गळा पांढऱ्या रंगाचा असून याची पाण्यावर उडताना सूर मारून मासे पकडण्याची तऱ्हा लक्ष वेधणारी आहे. लहान सरोता पक्ष्याचे दर्शन अतिदुर्मिळ असल्यामुळे पक्षिमित्र सचिन सरोदे, क्रिष्णा खान, अमिताभ ओगले, शशी ठवळी, सचिन थोते, अंगद देशमुख व क्रांती रोकडे या वन्यजीवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)