शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

'रतन इंडिया'ला जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 00:52 IST

रतन इंडिया कंपनीने बाधित शेतकऱ्यांच्या समस्या, प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांशी केला जाणारा अन्याय, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यांसह ..

अन्यथा कारवाई : ३१ मार्चपूर्वी समस्या निकाली काढा, एप्रिलनंतर दर आठवड्याला सुनावणीअमरावती : रतन इंडिया कंपनीने बाधित शेतकऱ्यांच्या समस्या, प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांशी केला जाणारा अन्याय, बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यांसह अन्य समस्या ३१ मार्चच्या आत निकाली न काढल्यास यापुढे प्रत्येक आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, असा सज्जड दम जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी रतन इंडिया पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकरी, कर्मचारी, शिवकामगार सेनेचे पदाधिकारी व रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, पं.स. सभापती आशिष धर्माळे, रतन इंडिया कंपनीचे कर्नल लोकेशसिंग, एम.जी. सिंग, राकेश रणजीत, पंकज कुमार तसेच प्रकल्पग्रस्त प्रवीण मनोहर, चंडकापुरे, प्रफुल्ल तायडे, राजेश बारबुध्दे आदी उपस्थित होते. कंपनीतील हिंदी भाषिक अधिकारी इतर कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना दुजाभाव सहन करावा लागतो. त्यांना कमी वेतन दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ‘पीएफ’च्या नावाखाली २४ टक्के रकमेची कपात केली जात असली तरी कंपनीद्वारे दिला जाणारा १२ टक्के निधी मात्र यामध्ये जमा केला जात नाही, अशा प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे आदेश असतानासुध्दा अद्याप शेतीपिकांची नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतीच्या वहिवाटीसाठी दिलेले रस्ते ५ ते ८ फूट पाण्याखाली बुडाले आहेत अशा समस्यांचा पाढाच यावेळी प्रकल्पग्रस्तांनी वाचला. गित्ते यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांची नावे, वेतनाची यादी कंपनीकडून मागविण्याचे निर्देश कामगार आयुक्तांना दिलेत. प्रदूषणाबद्दल कंपनीला नोटीस बजावून तत्काळ अहवाल मागविला.कंपनी अ‍ॅक्टचे उल्लंघन झाल्यास कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणूक दिली जाईल आणि सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न होईल, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. यासंदर्भात रतन इंडिया कंपनीचे अधिकारी कर्नल लोकेशसिंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)