लग्नाचे आमिष, अल्पवयीन मुलीवर अत्याचार नंतर नकार

By प्रदीप भाकरे | Updated: April 7, 2023 18:20 IST2023-04-07T18:20:15+5:302023-04-07T18:20:37+5:30

गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल

rape of minor girl by marriage lure | लग्नाचे आमिष, अल्पवयीन मुलीवर अत्याचार नंतर नकार

लग्नाचे आमिष, अल्पवयीन मुलीवर अत्याचार नंतर नकार

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी येथील कठोरा नाका परिसरातील खोलीत तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी ६ एप्रिल रोजी पहाटे २ च्या सुमारास आरोपी मोहित संदीप गवई (रा. अमरावती) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पीडितेचे मागील एक वर्षभरापासून आरोपी मोहितशी प्रेमसंबंध होते. दोघांनीही प्रेमाच्या आणा-भाका घेतल्या. दरम्यान, ऑक्टोबर २०२२च्या ३ तारखेला तो तिला दुचाकीवर बसवून त्याच्या मित्राच्या कठोरा नाका रोडवरील खोलीवर घेऊन गेला. त्याने तेथे तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला तिच्या घरी नेऊन सोडले. त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे घटनेच्या सहा महिन्यानंतर तिने गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले. तेथे महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तिचे जबाब नोंदवून घेतला तथा आरोपी मोहितविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: rape of minor girl by marriage lure