शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

राणांनी केला सोफियाच्या पाणीपुरवठ्याचा 'व्हॉल्व' बंद

By admin | Updated: May 1, 2016 00:02 IST

महानगराला पाणी पुरवठ्यासाठी टंचाई जाणवत आहे. व शासनाव्दारा सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाला उर्ध्व वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : तीन महिन्यांसाठी पाणीपुरवठा बंद कराअमरावती : महानगराला पाणी पुरवठ्यासाठी टंचाई जाणवत आहे. व शासनाव्दारा सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाला उर्ध्व वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ आ. रवी राणा यांनी शनिवारी सोफीयाला पाणी पुरवठा करण्यात येत असलेला व्हॉल्व बंद केला व तोडफोड केली.याविषयीचे निवेदन नांदगावपेठ येथील कार्यक्रमात आ. राणा यांनी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना दिले. पाण्याअभावी नागरी जीवन होरपळून निघाले आहे. बडनेरा शहराला आठ ते दहा दिवस पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता बघता आजपासूनच सोफियाचा पाणी पुरवठा तीन महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी आ.राणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.शासनाने मद्य निर्मिती कारखान्याचे पाणी वाटप बंद केले आहे. हाच प्रयोग अमरावती जिल्ह्यातील सोफिया प्रकल्पाबाबत राबवावा आणि सोफियाला दिले जाणारे २४ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचे पाणी बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली. पाणीटंचाईमुळे बडनेरा शहराला १०-१० दिवस पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. विदर्भासह संपूर्ण राज्यात पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता अमरावती शहर आणि बडनेरा वासीयांमध्ये सोफियाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. त्यामुळे सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला देण्यात येणारे पाणी बंद करावे, अन्यथा युवा स्वाभिमान तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा राणा यांच्या नेतृत्वात शनिवारी देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, अनुप अग्रवाल, रौनक किटुकले आदींची उपस्थिती होती.राणांना विमानतळावर रोखलेमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी रवी राणा कार्यकर्त्यांसह बेलोरा विमानतळावर गेले असता त्यांना जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी रोखले. त्यांनी एकट्यानेच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करावे, अशी विनंती केली. मात्र, आ. राणा पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सूचनेने रोखण्यात आल्याचा आरोप राणा समर्थकांनी केला.