शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्पाला लवकरच प्रारंभ

By admin | Updated: September 5, 2016 00:19 IST

बडनेरा रेल्वे वॅगन कारखान्याच्या बांधकामासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे मुख्य अभियंता भूषण पाटील यांनी जागेची पाहणी केली आहे.

खासदारांचा पाठपुरावा : झेडआरयूसीसीच्या बैठकीत गाजला मुद्दाअमरावती : बडनेरा रेल्वे वॅगन कारखान्याच्या बांधकामासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे मुख्य अभियंता भूषण पाटील यांनी जागेची पाहणी केली आहे. त्यामुळे काही वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. यापूर्वी खा.आनंदराव अडसूळ यांनी प्रक ल्पाचे काम त्वरित सुरु करावे, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे.मुंबई येथे रेल्वेच्या विभागीय दक्षता समितीची बैठक शनिवारी पार पडली. यामध्ये झेडआरयूसीसीचे सदस्य सुनील भालेराव यांनी बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना निर्मितीचे काम रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी खा.अडसूळ यांनी रेल्वे मंत्रालय ते पटना येथे रेल्वे वर्कशॉप इंजिनियरिंग व मध्य रेल्वे महाप्रबंधक सीएसटी मुंबई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने उच्च न्यायालयात प्रबंधित असलेले विविध प्रकरण खारीज करण्यात आले. मध्य रेल्वेने वॅगन दुरुस्ती कारखान्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी सुनील भालेराव यांनी बैठकीत केली. या मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या दोन्ही निविदा मंजूर केल्या असून इंजिनिअरिंग वर्कशेड व कंपाऊंड वॉलच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा हे येणार असल्याची माहिती देण्यात आली. झेडआरसीसीचे सदस्य सुनील भालेराव यांच्यासह मुख्य अभियंता वर्कशॉप विभाग मध्य रेल्वे मुंबई भूषण पाटील यांनी भुसावळ डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांसोबत अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनची पाहणी केली. वॅगन दुरुस्ती कारखान्याची जमिनीची पाहणी करून अधिकाऱ्यांना जमिनीचे सीमांकन तत्काळ करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी सुनील भालेराव व डी.आर.सी.सी.मेंबर प्रकाश मंजलवार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वागत केले आहे.कोकण- नागपूर स्पेशल ट्रेन नियमित सुरु कराबडनेरा येथे थांबणारी १०८३ नागपूर-करमाली ही स्पेशल ट्रेन नियमित सुरू करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. १३ आॅगस्ट रोजी सुरू करण्यात आली होती. नागपूर-वर्धा, अमरावती येथून कोकणात व गोव्याकडे जाण्यासाठी एकही गाडी उपलब्ध नसल्याने या गाडीची मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वे बोर्डाकडे केलेली आहे. सदर गाडी नियमित सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्याकडून पाठविण्यात यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. दिवाळीदरम्यान स्पेशल ट्रेन नागपूर-पुणे सुरू करण्यात येणार असून त्यासोबतच नागपूर-रत्नागिरी-करमाली १०८३ सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. सदर रेल्वे गाडी नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली. यासोबत नरखेड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण डिसेंबर २०१६ अखेर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.