शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

By admin | Updated: March 8, 2016 00:14 IST

रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील जागा काबीज करणाऱ्या बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

टास्क फोर्स गठित : मुंबई विभागांतर्गत कागदपत्रे तपासणारअमरावती : रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील जागा काबीज करणाऱ्या बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता टास्क फोर्स गठित करण्यात आला. ही चमू मुंबई विभागांतर्गत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणार आहे.रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून बोगस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची तक्रार थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे देण्यात आली आहे. बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भरणा हा केवळ मुंबई विभागापुरताच नसून तो देशभरात पसरला असल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने म्हटले आहे. विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील बनावट कागदपत्रे सादर करुन मोक्याचा जागा बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेल्वेत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी बडे अधिकारी असल्यामुळे बोगस कर्मचाऱ्यांचे शुद्धिकरण होत नाही, असे तक्रारीत नमूद आहे. रेल्वेत ज्यांना नोकऱ्या मिळणे अपेक्षित होते, त्यांच्या जागी बनावट कागदपत्रे सादर करून अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून रेल्वेत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांना फावत आहे. मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्याचे निर्देश मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधकांना दिले आहे. मुंबई विभागातील पुणे, सोलापूर, भुसावळ, मुंबई व नागपूर या विभागांतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जात पडताडणीचे कागदपत्रे तपासणी करण्यासाठी टॉस्क फोर्स गठित करण्यात आले आहे. पाचही विभागासाठी स्वतंत्र पथक आहे. अमरावती व बडनेरा रेल्वेस्थानकावरसुद्धा मोठ्या प्रमाणात बोगस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची तक्रार यापूर्वीच भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक गुप्ता यांच्याकडे देण्यात आली आहे.जात पडताळणी विभागाचा कारभार कासवगतीनेअनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी बळकाविण्याची अनेक प्रकरणे रेल्वेत उघडकीस आली आहेत. मात्र, या प्रकरणांविषयी जात पडताळणी विभागात तक्रारी दाखल असताना निर्धारित वेळेत निकाल लागत नसल्याचा आक्षेप आहे. एकट्या अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील १९ बनावट कागदपत्रांची प्रकरणे प्रलंबित आहेत. जात पडताळणी विभागाचा कारभार कासवगतीने सुरु असल्याचा आरोप आहे.रेल्वेत बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी बळकाविणाऱ्या बोगस अधिकारी, कर्र्मचाऱ्याविरुद्धचा लढा सुरु आहे. घटनाबाह्यरित्या नियुक्त अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. टास्क फोर्स गठित झाल्यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत.- नंदराज मघाडे, रेल्वे कर्मचारी, बडनेरा