शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

परवाना निलंबनाची रघुवीरवर टांगती तलवार

By admin | Updated: October 11, 2016 00:12 IST

सर्वाधिक महागडा नाश्ता विकणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानच्या कचोरीत अळी आढळल्याचे धक्कादायक वास्तव 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले होते.

प्रक्रियेला वेग : निर्माण होणारे अन्न आरोग्याला घातक अमरावती : सर्वाधिक महागडा नाश्ता विकणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानच्या कचोरीत अळी आढळल्याचे धक्कादायक वास्तव 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले होते. यासंबंधाने केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने रघुवीरचा परवाना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. कुणी किती रुपयांत वस्तू विकाव्यात यासाठी व्यापार नियमन असतानाही तोकड्या सेवा पुरवून भरमसाठ पैसे आकारणाऱ्या रघुवीरच्या अन्नपदार्थांचा दर्जाही मनुष्याच्या आरोग्याला घातक ठरणारा असल्याचे समोर येऊ लागले आहे. ग्राहकांना अनेकदा कचोरी, पॅटीस अशा पदार्थांमध्ये झुरळ, फकडी, दगड आढळून आले. यासंबंधाने त्यांनी रघुवीरकडे तक्रारीही केल्या. परंतु ग्राहकांची बाजू कमजोर पडल्याने फारसे काही होऊ शकले नव्हते. तगडे पैसे घेऊन विकल्या जाणाऱ्या नाश्त्यात अनेकदा आक्षेपार्ह कीटक आढळून आल्यावरही आपले काहीच बिघडत नाही, हे लक्षात आल्यामुळे रघुवीरच्या नाश्त्याच्या दर्जात कुठलाही सुधार झाला नाही. 'लोकमत'ने अळीचे प्रकरण उघडकीस आणल्यावर व त्याअनुषंगाने ग्राहकाने तक्रार नोंदविल्यावर अन्न प्रशासन विभागाने रघुवीर प्रतिष्ठानवर छापे मारले. नमुने घेतले. तपासणी केली. मुळात अन्न प्रशासन विभागाने छापे मारण्यास विलंब केला. अन्नाचे भेसळयुक्त वा दूषित नमुने सापडू नये, यासाठीची पूर्णत: काळजी रघुवीरकडून घेण्यात आली. तथापि नियमांना तिलांजली देऊन अधिक लाभासाठीचा व्यवसाय करण्याच्या सवयीत जखडलेल्या रघुवीर प्रतिष्ठानला अन्न प्रशासनाच्या नियम काय याबाबतची पुरेपूर माहिती नव्हतीच. ज्या नियमांचे कधी पालनच केले नाही, त्यांचा अंगीकार करणे क्षणात शक्य होणार कसे? अन्न प्रशासनाच्या तपासणीत अनेक आक्षेपार्ह मुद्दे अधिकाऱ्यांना आढळून आलेत. अन्न निर्मितीच्या ठिकाणी अत्यंत घाणेरडेपणा आणि गलिच्छता असल्याच्या नोंदी अधिकाऱ्यांनी कारवाईदम्यान घेतल्या आहेत. अन्न निर्मितीसाठी मुळीच स्वीकार्य नसलेले वातावरण रघुवीरमध्ये असल्याचे मत अधिकाऱ्यांनी नोंदविले. अशा वातावरणातील अन्न खवय्यांना आजार प्रदान करू शकते, हेदेखील तपासणीतून पुढे आले. ग्राहकांच्या जीवाशी हा खेळ केल्याच्या कारणावरून रघुवीरचा परवाना निलंबित केला जाणार आहे. यासंबंधाने प्रक्रिया आरंभण्यात आली आहे. अस्थायी आणि स्थायी अशा दोन स्वरुपात परवाना निलंबित करण्याचे अधिकार एफडीएला आहेत. कारवाईचे स्वरुप कठोर असावे, यासाठी 'लोकमत'चा पाठपुरावा सुरू आहेच.