हॉटेलमध्ये कांद्याऐवजी मुळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:37+5:30
दोन महिन्यांपासून कांद्याचे वाढते दर नागरिकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. त्याअनुषंगाने पूर्वी हॉटेलमध्ये कॉम्प्लीमेंट्री म्हणून सलादमध्ये कांदा व लिंबू देण्यात येत होते. मात्र, आता लहान हॉटेलचालकांनी हात आवरता घेतला आहे. लिंबू मिळतो परंतु कांदा महागल्याने त्याला पर्याय म्हणून मुळा देण्यात येत आहे. कुणी कांदा मागितला तर काही दिवस कांदा मिळणार नसल्याचे थेट हॉटेल चालकांकडून सांगण्यात येत आहे.

हॉटेलमध्ये कांद्याऐवजी मुळा
अमरावती : ठोक बाजारात ७० रुपये किलो, किरकोळ बाजारात ९० ते १०० रुपये किलोने कांद्याची विक्री होत असल्याने हॉटेलमध्ये जेवणात पूर्वी कांदा देण्यात येत होता. मात्र, आता कांद्याऐवजी पांढरा मुळा वापरात येत आहे. सद्यस्थितीत मुळा स्वस्त आहे. पाच रुपयांचा एक मुळा मिळत असल्याने त्यावर वेळ भागविली जात आहे.
दोन महिन्यांपासून कांद्याचे वाढते दर नागरिकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. त्याअनुषंगाने पूर्वी हॉटेलमध्ये कॉम्प्लीमेंट्री म्हणून सलादमध्ये कांदा व लिंबू देण्यात येत होते. मात्र, आता लहान हॉटेलचालकांनी हात आवरता घेतला आहे. लिंबू मिळतो परंतु कांदा महागल्याने त्याला पर्याय म्हणून मुळा देण्यात येत आहे. कुणी कांदा मागितला तर काही दिवस कांदा मिळणार नसल्याचे थेट हॉटेल चालकांकडून सांगण्यात येत आहे. गाजर व टमाटरसुद्धा महागले. त्यामुळे तेही हॉटेलमध्ये देण्यात येत नाही. त्याऐवजी काकडी दिली जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना हॉटेलमध्ये जेवणात कांदा मिळत नसल्याने दुधाची तहान ताकावर भागविण्याची वेळ आली आहे. सध्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा ठोकमध्ये १०० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. बारीक कांदा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो मिळत आहे. पांढऱ्या व लाल कांद्याचे दर १०० रूपये किलोंवर पोहचल्याने नागरिकांच्या भोजनातून कांदा बाद झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कांदा व लसूणचे दर वधारल्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेटही कोलमोडले आहे. यंदा परतीच्या पावसाने खरिपातील कांद्याच्या पिकांचे नुकसान झाल्याने कांद्याची आवक घटल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
५५० पोते कांद्याची आवक
येथील बाजार समिती अंतर्गत भाजीमंडईत पांढºया व लाल कांद्याची एकूण ५५० पोते कांद्याची आवक झाली आहे. यामध्ये पांढºया कांद्याची आवक २३५ पोते झाली असून त्याला क्विंटलमागे ६ हजार ते ८ हजारांचा भाव मिळाला. हाच कांदा किरकोळ बाजारात १०० रुपयांपेक्षा जास्त किलोने विक्री होत आहे. लाल कांद्याची ३१३ पोत्यांची आवक झाली.त्याला पाच ते सात हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.