शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत राडा; तीन तास काम बंद

By admin | Updated: March 12, 2016 00:05 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडून हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी हमाल, मापारी ...

अडत्यांकडून हमालास पट्ट्याने मारहाण : पोलिसात परस्परविरोधी तक्रार, दोन दिवसांनंतर होणार कारवाईअमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडून हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी हमाल, मापारी संघटनांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. परिणामी बाजार समितीचे कामकाज तीन तास ठप्प झाले. अखेर दोन दिवसांनंतर मारहाण करणाऱ्या अडत्यावर ठोस कारवाई केली जाणार, या प्रशासनाच्या आश्वासनानंतर हमालांनी पुकारलेले कामबंद आंदोलन शेतकरी हितासाठी मागे घेण्यात आले. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.रावसाहेब लोभाजी दळवी (५५ रा. संतोषीनगर, अमरावती) हे बाजार समितीत ओमप्रकाश मुंदडा या अडत्याकडे हमालीचे काम करतात. नेहमीप्रमाणे रावसाहेब दळवी हे शेतीमाल घेऊन आलेले वाहन उभे करून त्यातील माल काढण्याची तयारी करीत होते. मधस्थी करणाऱ्यासही फटकाअडते गोविंद टवानी हे रावसाहेब दळवी यांना पट्ट्याने मारहाण करीत असल्याचे बघून मधस्थी करण्यास गेलेले शकील शाह खलीद शाह या हमालासदेखील पट्ट्याचा तोंडावर मार बसला, हे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. शकील शाह यांच्या तोंडावर मार लागल्याचे दिसून आले.पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखलकृषी उत्पन्न बाजार समितीत हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. रावसाहेब दळवी यांना पट्ट्याने मारहाण केल्याप्रकरणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच गोविंद टवानी व बाळू वानखडे या अडत्यानेदेखील हमालांनी हुकने वार केल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १६० अन्वये गुन्हे दाखल केले आहे.बाजार समिती सभापती मुंबईला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे हे वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बाजार समितीत अडते, हमालांमध्ये झालेल्या वादावर ते मुंबईहून लक्ष ठेवून होते. त्यामुळे हा वाद विकोपाला जाऊ नये, यासाठी उपसभापतींसह काही संचालकांना त्यांनी बाजार समितीत पाठवून तोडगा काढण्यासाठी पाठविले होते, अशी माहिती आहे.हमालास मारहाणीची घटना निंदनीय आहे. मात्र शेतकरी हितासाठी बाजार समितीचे कामकाज बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सभापती परत येताच संबंधित अडत्यांवर दोन दिवसांत कारवाई केली जाईल.- बंडू वानखडे, संचालक, बाजार समितीव्यापारी आणि हमालांच्या आपसी समझोत्याने तोडगा निघाला आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही, याबाबत समज देण्यात आली आहे. बाजार समितीचे कामकाज नियमित सुरू झाले आहे.- सतीश अट्टल,संचालक, बाजार समिती