शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’ विरोधात जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

‘मुव्हमेंट अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआर’ या बॅनरखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, डिप्टी ग्राऊंड येथे सभा घेण्यात आली. यावेळी ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम नाही, तर धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांच्या विरोधात असल्याची बाब मान्यवरांनी स्पष्ट केली. अगोदर स्वातंत्र्याची लढाई लढली; आता केंद्र सरकारने आणलेला काळा कायदा रद्द करण्यासाठी स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रपतींना पाठविले निवेदन : वलगाव मार्गावरील डिप्टी ग्राऊंड ते जिल्हा कचेरीदरम्यान विशाल मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय जनसंख्या नोंदणी (एनपीआर) या काळ्या कायद्यांविरोधात सोमवारी मुस्लिम बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला. येथील वलगाव मार्गावरील डिप्टी ग्राऊंड ते जिल्हा कचेरीदरम्यान निघालेल्या मोर्चातील गर्दी लक्ष वेधणारी होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.‘मुव्हमेंट अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआर’ या बॅनरखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, डिप्टी ग्राऊंड येथे सभा घेण्यात आली. यावेळी ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम नाही, तर धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करू पाहणाऱ्यांच्या विरोधात असल्याची बाब मान्यवरांनी स्पष्ट केली. अगोदर स्वातंत्र्याची लढाई लढली; आता केंद्र सरकारने आणलेला काळा कायदा रद्द करण्यासाठी स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.दरम्यान, मोर्चाच्या मार्गावरील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चेकऱ्यांनी ‘मोदी-शहा तुम्हारी तानाशाही नही चलेंगी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘आवाज दो हम एक है’, ‘संविधान के सन्मान में - हम मैदान में’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.मोर्चापूर्वी सभेचे आयोजनमुस्लिम बांधवांची मोर्चा काढण्यापूर्वी स्थानिक वलगाव मार्गावरील डिप्टी ग्राऊंड मैदानावर सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. उपस्थितांना मोर्चा आयोजनामागील भूमिका मान्यवरांनी समजावून सांगितली. राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’ कायदा रद्द करावा, अलिगढ येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आसाम व उत्तर प्रदेशात पोलीस प्रशासनाच्या अमानवीय हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी व्हावी, भीम आर्मी संस्थेचे चंद्रशेखर यांची कारागृहात सुटका करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा