आधीच कोरोना महामारीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा न देता उलट या कठीण परिस्थितीत पेट्रोलचे दर १०८ च्या घरात पोहोचविले. डिझेलसुद्धा शंभरी गाठण्यातच आहे. सोबतच घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहे. त्याविरोधात मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश काळे यांच्या नेतृत्वात सायकल मार्च तसेच केंद्र सरकारची तिरडी काढून निषेध नोंदविला. स्वाक्षरी अभियानदेखील राबविण्यात आले. यावेळी डॉ. धनंजय तट्टे, प्रकाश टेकाडे, मेहबूब दौला, हमीद खाँ पठाण, खलील सेठ, गफ्फार चाचा, नेरपिंगळाई सरपंच सविता खोडस्कर, अभिजित मानकर, मनोज टेकाडे, अफसर पठाण, सूरज अवचार, साजिद पठाण, संजय मोहोकार, अतुल खोडस्कर, शमशेर खान, नीलेश तट्टे उपस्थित होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}