शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

महाविद्यालये अन् अभ्यासक्रम गुंडाळण्याचा सपाटा, अमरावती विद्यापीठाकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 6:47 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सात  महाविद्यालये बंद करण्यासह नऊ अभ्यासक्रम गुंडाळण्याबाबत विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

- गणेश वासनिक 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सात  महाविद्यालये बंद करण्यासह नऊ अभ्यासक्रम गुंडाळण्याबाबत विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यावर १४ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. महाविद्यालयांमध्ये प्रवेश रोडावल्याने ही पावले उचलल्याचे बोलले जात आहे.विद्यापीठाने गठित केलेल्या चौकशी समितीच्या अहवालावरून शारीरिक शिक्षण महाविद्यालय (उमरखेड, जि. यवतमाळ), ईश्वरभाऊ देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय (दिग्रस, जि. यवतमाळ), कॉलेज आॅफ मॅनेजमेंट सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी (अकोला), कुमुदिनी भदे महाविद्यालय (अकोला), डी.बी. भदे महाविद्यालय (अकोट, जि.अकोला), सातपुडा शिक्षण संस्थाद्वारे संचालित विज्ञान महाविद्यालय (जळगाव जामोद, जि. बुलडाणा), विज्ञान (बी.सी.ए) महाविद्यालय (दर्यापूर, जि. अमरावती) अशी सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यवतमाळ  येथील डॉ. भाऊसाहेब नांदूरकर कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये बी.ई.चे तीन अभ्यासक्रम आणि एम.ई.चे दोन अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव आहे. पुसद (जि. यवतमाळ) येथील गुलाब नबी आझाद शिक्षण महाविद्यालयातील एम.एड अभ्यासक्रम, वाशिम येथील कै. अ‍ॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयातील एल.एल.बी. अभ्यासक्रम, शेगाव (जि. बुलडाणा) येथील सरस्वती कॉलेजमधील एम.सी.ए. भाग-२ अभ्यासक्रम, अमरावती येथील हरिकिसन मालू इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या एम.सी.ए. अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी शैक्षणिक संस्थाचालकांकडून अमरावती विद्यापीठात महाविद्यालय बंद आणि अभ्यासक्रम गुंडाळण्याची परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती गठित करून त्याबाबत चौकशी अहवाल प्राप्त केला आहे.आता ही महाविद्यालये आणि अभ्यासक्रम बंद करण्यासाठी व्यवस्थापन परिषद आणि त्यानंतर सिनेट सभागृहाची मान्यता घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने तयारी चालविली आहे. दरवर्षी महाविद्यालये बंद करण्याबाबतचे प्रस्ताव विद्यापीठांकडे सादर होत असून, गतवर्षी चार अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय झाला होता, हे विशेष.राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेकडून  आठ महाविद्यालयांची मान्यता गोठविलीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आठ महाविद्यालयांची भोपाळ येथील राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, पश्चिम क्षेत्रीय समितीने मान्यता गोठविली आहे. यात अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील स्व. अनिल रामदास कांबे बी.एड. कॉलेज, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील श्री. गोविंदराव पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथील लोकहित बी.पी.एड. महाविद्यालय, यवतमाळचे लोहारा येथील श्री साई शिक्षण महाविद्यालय, दिग्रस येथील ईश्वर देशमुख शिक्षण महाविद्यालय, बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील दादासाहेब रमेशसिंह शिक्षण महविद्यालय, बुलडाणा येथील विदर्भ युवक संस्थेचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच अमरावतीलगत बडनेरा-कोडेंश्वर मार्गावरील शहीद भगतसिंग शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांचा समावेश आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAmravatiअमरावती