शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहित जागेसाठी प्रकल्पग्रस्तांची पायपीट

By admin | Updated: May 11, 2015 23:54 IST

नजीकच्या सुकळी येथील महापालिकेने कम्पोस्ट डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी अधिग्रहित केलेली....

पालकमंत्रांच्या निर्णयाला बगल : कम्पोस्ट डेपो जमिनीचा प्रश्नअमरावती : नजीकच्या सुकळी येथील महापालिकेने कम्पोस्ट डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी अधिग्रहित केलेली १८ हेक्टर जमीन परत मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची पायपीट सुरु आहे. ही जमीन विनाशर्त परत करण्याचा निर्णय पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतला असताना प्रशासन नियमांचे ढोल वाजवून प्रकल्पग्रस्तांची बोळवण करीत असल्याचे चित्र आहे.कम्पोस्ट डेपोत तुंबलेली कचऱ्याची टेकडी रिकामी करणे हे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यानुसार तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांनी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प साकारण्याची जबाबदारी मुंबईच्या ईको फिल या कंपनीला दिली होती. प्रकल्पासाठी लागणारी १८ हेक्टर आवश्यक असलेली जमीनदेखील आठ शेतकऱ्यांकडून एकतर्फा अधिग्रहित करण्यात आली. या जमिनीला कमी भाव मिळाल्याची ओरड करुन प्रकल्पग्रस्तांनी विरोध नोंदविला. मात्र पोलीस बळासमोर प्रकल्पग्रस्तांचे काहीही चालले नाही. अखेर शिवसेनेचे विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, माजी नगरसेवक बबन रडके यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी कचरा डेपोवर येणारी वाहने रोकण्याचे आंदोलन सुरु केले. तब्बल चार दिवस चाललेल्या या आंदोलनाने प्रशासन त्यावेळी हतबल झाले. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मध्यस्थी करुन कचरा डेपो जमीन अधिग्रहणावर सकारात्मक तोडगा काढला. कचरा डेपोसाठी नवीन जागेचा शोध घेण्याचा निर्णय घेताना हस्तांतरित करण्यात आलेली जमीन विनाशर्त परत करण्याचे बैठकीत पालमंत्र्यांनी ठरविले, हे विशेष. महापालिकेत ११ फेब्रुवारी २०१५ रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे व तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची कम्पोस्ट डेपो संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ना. पोटे यांनी कचरा डेपोसाठी नवीन जागेचा शोध घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. परंतु अधिग्रहित १८ हेक्टर जमीन विनाशर्त प्रकल्पग्रस्तांना परत करण्यावर पालकमंत्र्यांनी बैठकीतील इतिवृत्तांतावर स्वाक्षरी केल्याचे नमूद आहे. ही जमीन प्रकल्पग्रस्तांना परत करण्याचा निर्णय घेताना त्यांनी याबाबतचा ठराव सभेत मंजूर करुन शासनाकडे पाठविण्याचा सूचना प्रशासनाला दिल्या. पालकमंत्र्यांच्या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्त हे जमीन परत घेण्यासाठी महापालिकेत येरझारा मारत आहेत. परंतु ही जमीन विशेष कायद्याव्दारे ताब्यात घेतली आहे. (प्रतिनिधी)या शेतकऱ्यांची आहे जमीनकचरा डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. यात भानुदास लकडे, रमेश गुलवाडे, दामोधर जाधव, परशुराम कुंभार, दत्तात्रय नांदूरकर, विष्णूपंत अंबाडकर व कान्होबा देवस्थानच्या जमिनीचा समावेश आहे. १८.४४ हेक्टर एवढी जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे.पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आयुक्तांसमक्ष प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विनाशर्त परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री हे स्वत: शासन म्हणून बैठकीला हजर होते. प्रशासनाने जमीन परत करताना ज्या काही बाबी पूर्ण करायच्या असेल त्या लवकर पूर्ण करुन पावसाळ्यापूर्वीच निर्णय घ्यावा. अन्यथा पुन्हा आंदोलन उभे केले जाईल.- प्रवीण हरमकर, विरोधी पक्षनेता, महापालिका.