शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलांना आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

आता गर्भवती महिलांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली व या सात महिन्यांच्या कालावधीत गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येत नव्हती. आता याविषयीच्या चाचण्या झाल्यामुळे गर्भवती महिलांना ही लस घेता येणार आहे. या महिलांना कुठलाही आजार असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

ठळक मुद्देशासनाच्या मार्गदर्शक सूचना, स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी लस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आता लसीकरण मोहिमेला गती आलेली आहे. नागरिकांचा प्रतिसाददेखील मिळत आहे. यात आता गर्भवती महिलांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली व या सात महिन्यांच्या कालावधीत गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येत नव्हती. आता याविषयीच्या चाचण्या झाल्यामुळे गर्भवती महिलांना ही लस घेता येणार आहे. या महिलांना कुठलाही आजार असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. याविषयी आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी व्हिसीद्वारे मार्गदर्शन केले आहे. यामुळे गर्भवती महिलेचा कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार आहे. मात्र, लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यापूर्वी मासिक पाळी दरम्यान लस घेता येते की, नाही याविषयी संभ्रम होता, मात्र,  रोग प्रतिकारशक्तीशी याचा कुठलाही संबंध नसल्याचे आरोग्य विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. स्तनदा मातांना यापूर्वीच लसीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतर आता हा मोठा निर्णय असल्याचे मानले जात आहे.

गर्भवती महिलांनी ही घ्यावी काळजी

लस घेण्यापूर्वी भरपूर नाष्टा किंवा जेवण करावेलसीकरणानंतर कुठेलेही लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन महत्त्वाचे आहे.३५ वर्षांवरील महिलांनी लस घेतेवेळी सहव्याधीची कल्पना डॉक्टरांना द्यावी.लसीकरणापूर्वी स्त्री रोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

लसीकरणामुळे गर्भवती महिलांचे कोरोनापासून संरक्षण होईल. मात्र, प्रकृती ठिक नसल्यास त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी. - डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

लसीकरणामुळे बाळ व आईचे कोरोना संसर्गापासून संरक्षण होईल व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. - डाॅ श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस