अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा; अमरावतीतील धक्कादायक घटना
By प्रदीप भाकरे | Updated: January 12, 2023 13:08 IST2023-01-12T13:06:45+5:302023-01-12T13:08:42+5:30
गुन्ह्याची नोंद करताच आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना

अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा; अमरावतीतील धक्कादायक घटना
अमरावती : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना दर्यापुर शहरात उघड झाली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी आरोपी शाम देवराव लुटे (२४, पिंपळोद) याच्याविरूद्ध बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. ११ जानेवारी रोजी रात्री ११.४३ च्या सुमारास त्या गुन्ह्याची नोंद करताच आरोपीच्या शोधार्थ एक पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका गावची रहिवासी असलेली ती मुलगी गतवर्षी दर्यापूर येथे एका घरी भाड्याने राहत असताना तिचे आरोपी शाम लुटे याच्याशी ओळख झाली. त्याने तिला प्रेमजाळ्यात ओढले. तथा तिला लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत शारीरिक बळजबरी केली. दरम्यान, तिला गर्भधारणाची चाहूल लागताच तिने वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी आपल्याला गर्भधारणा झाल्याचे तिच्या लक्षात आले. प्रेग्णंसी किटने त्यावर शिक्कामोर्तब केले. ती बाब तिने पालकांना सांगितली. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ती राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत तिचेवर अतिप्रसंग करण्यात आला होता.