शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात आता विद्युत दिवे निर्माण प्रकल्प

By admin | Updated: November 2, 2014 22:23 IST

कारागृहातील बंदीजनांचे कौशल्य वाढीस लागावे, त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती नाहीसी व्हावी, या हेतूने येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लवकरच विद्युत दिवे निर्माण करण्याचा प्रकल्प साकारला जाणार आहे.

गणेश वासनिक - अमरावतीकारागृहातील बंदीजनांचे कौशल्य वाढीस लागावे, त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती नाहीसी व्हावी, या हेतूने येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लवकरच विद्युत दिवे निर्माण करण्याचा प्रकल्प साकारला जाणार आहे. या नवीन प्रकल्पात ४०० ते ५०० बंदिजनांना सामावून घेतले जाणार आहे. सध्या येथे बंदी जणांसाठी काही लघु उद्योग सुरु आहेत. येथील मध्यवर्ती कारागृहात हल्ली महिला, पुरुष अशी १०८० एवढी बंदी जणांची संख्या आहे. सूर्योदय ते सूर्यास्त अशी कारागृहात बंदिजणांची दिनचर्या असली तरी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची आहे. यामुळे प्रशासनाच्याही उत्पन्नात वाढ होते. बंदीजनांच्या कौशल्याचा वापर करुन त्यांच्या हातून विविध वस्तू तयार करुन त्या विक्रीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची नियमावली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने बंदीजणांच्या हातून विद्युत दिवे निर्माण करण्याचे ठरविले आहे. बंदीजनांना विद्युत दिवे निर्माण करण्याचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी वर्धा येथील एका एजन्सीसोबत बोलणीसुद्धा सुरु आहे. येत्या आठवड्यात ही एजन्सी येथील कारागृहात येणार असल्याची माहिती आहे. कारागृहाच्या क्षमतेनुसार विद्युत दिवे निर्माण करण्याचा प्रकल्प साकारण्याची तयारी प्रशासनाची आहे. प्रारंभी छोट्या स्वरुपात प्रकल्प सुरु केला जाणार असून भविष्यात विद्युत दिव्यांची मागणी वाढल्यास या प्रकल्पाचा विस्तार केला जाईल. विद्युत दिवे निर्मितीसह सुगंधी तेल, खोबरेल तेल पॅकिंगचाही लघु उद्योग सुरु करण्यावर कारागृह प्रशासनाचा भर आहे. कारागृह विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मनात न्युनगंडाची भावना निर्माण न होऊ देता रोजगार निर्मितीचे वेध लागावे यासाठी वेगवेगळे प्रकल्प साकारले जात आहेत.