शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी काँग्रेस, भाजपात जोरदार रस्सीखेच

By admin | Updated: September 20, 2014 23:41 IST

विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजप

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. संख्याबळाची कसरत करताना नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.५९ सदस्य संख्या असलेल्या अमरावती जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य संख्या काँग्रेस पक्षाजवळ आहे. त्यानंतरही सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस पक्षाने यावेळी सत्ता काबिज करण्याची खुणगाठ बांधून ३१ सदस्यांची जुळवाजुळव केल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेनेनेही आपल्याजवळ सत्तेसाठी लागणारा मॅजिक फिगर असल्याचा दावा केला केला आहे. हा आकडा कायम राहून निवडणुकीत त्याचा परिणाम होण्यासाठी पक्ष नेत्यांच्या बैठकींना वेग आला आहे. नव्या दमाने पुन्हा सत्तेसाठी आरूढ होण्याचे मनसुबे दोन्ही बाजूने रचले जात आहेत. जिल्हा परिषदेत सर्वाधिक २५ एवढे संख्याबळ काँग्रेस जवळ आहे. हे संख्याबळ असतानाही मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना, भाजप व अन्य पक्षांशी हातमिळवणी करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद काबीज केले होते. या निवडणुकीतून काँग्रेसला बाजुला सारले होते. हा इतिहास लक्षात घेता काँग्रेस अजूनही राष्ट्रवादीवर भरोसा ठेवायला तयार नाही. यावेळी काँग्रेसनेही इतर लहान पक्षांच्या सदस्यांची जुळवाजुळव करुन मॅजिक फिगर पूर्ण करणारी समिकरणे जुळविल्याची माहिती आहे. अशातच शिवसेना-भाजप पक्षानेही मागील वेळीप्रमाणे यंदाही सत्तेसाठी विविध घडामोडी करुन सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. शनिवारी दिवसभर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी विविध घडामोडी सुरू होत्या. (प्रतिनिधी)