शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोडीच्या विरोधात स्थगनादेश

By admin | Updated: September 30, 2014 23:31 IST

नगरपरिषद तुमसर विरुद्ध नागपूर उच्च न्यायालयाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरला बांधकाम तोडफोडीच्या विरोधात स्थगनादेश दिला आहे.

तुमसर : नगरपरिषद तुमसर विरुद्ध नागपूर उच्च न्यायालयाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरला बांधकाम तोडफोडीच्या विरोधात स्थगनादेश दिला आहे.तुमसर नगरपरिषदच्या वतीने जुन्या गंज बाजारातील बाराकारी बांधकाम पाडायला सुरुवात केली होती. नगरपरिषद तुमसर ही मालमत्तेची मालक नसल्यामुळे संबंधित जागेवर नगरपरिषदला काही बांधकाम करावयाचे असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीची लिखीत मंजूरी द्यावी. तसेच आतापर्यंत किरायाने दिलेल्या दुकानात, गाळे यांच्याकडून प्राप्त झालेला किराया वेगळे खाते करून ठेवण्यात यावे. असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नगरपरिषदला दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीला शासकीय परिपत्रकानुसार जुना गंज बाजार मधील जागा देण्यात आली होती. त्यामुळे या जागेसाठी तुमसर नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरण भंडारा न्यायालयाने रद्द केला. या विरोधात तुमसर नगरपरिषदेने भंडारा जिल्हा न्यायालयाला अपील केले. अपिल प्रलंबित असताना नगरपरिषदेने बाराद्वारेचे बांधकाम पाडायला सुरुवात केली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर, मोहाडी ते बाराकाटी बांधकाम तोडफोड प्रकरण थांबविण्याकरिता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर मध्ये याचिका दाखल केली होती. बाजार समितीच्या वतीने अ‍ॅड.सुभाष पालीवाल व अ‍ॅड. सौमित्र पालीवाल यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी तुमसर नगरपरिषदेला आदेश दिले की सुरु असलेले बांधकाम ताबडतोब थांबवावे. तसेच बांधकाम करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीयांची मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले. बाराद्वारीच्या जागेत जेवढे दुकाने व गाळे किरायाने यांचे लिखीत खाते तयार ठेवावे असे आदेशात म्हटले आहे. नगरपरिषद तुमसर कडून अ‍ॅड.महेश धात्रक यांनी काम बघितले. (तालुका प्रतिनिधी)