शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

संत गुलाबराव महाराज यांच्यावर डाकतिकीट, गीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रकाशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:11 PM

संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थान (ता. चांदूरबाजार) येथे गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे. 

अमरावती : प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थान (ता. चांदूरबाजार) येथे गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे. अमरावती फिलाटेलिक सोसायटी व श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्था (भक्तिधाम, ता. चांदूरबाजार) यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. सोसायटीचे अध्यक्ष कृ.ब. निंबाळकर हे प्रस्तावक आहेत. अमरावती फिलाटेलिक सोसायटीमार्फत पाठविलेल्या चार प्रस्तावांपैकी शिवाजीराव तथा दाजीसाहेब पटवर्धन यांच्यावरील डाकतिकीट २७ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाले, तर संत गुलाबराव महाराजांवरील डाकतिकीट प्रकाशित होत आहेत. स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब खापर्डे व वीर वामनराव जोशी यांच्यावरील डाकतिकिटाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. विदर्भातील १० महापुरुषांच्या स्मरणार्थ आतापर्यंत डाकतिकीट प्रकाशित झाले आहेत. जमनालाल बजाज यांच्यावरील डाकतिकीट १९७० मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९९५), कर्मयोगी संत गाडगेबाबा (१९९८), डॉ. केशव हेडगेवार (१९९९), कृषिमहर्षी भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख (१९९९), ब्रिजलाल बियाणी (२००२), जवाहरलाल दर्डा (२००५), डॉ. माधव श्रीहरी अणे (२०११), बाबा आमटे (२०१४) व डॉ. शिवाजीराव पटवर्धन (२०१७) यांची डाकतिकिटे प्रकाशित झाली. विशेष म्हणजे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्यानंतर कर्मभूमीतच डाकतिकिटाचे प्रकाशन होणारी संत गुलाबराव महाराज ही अमरावती जिल्ह्यातील दुसरी व्यक्ती ठरणार आहे.