शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या योजनेला घरघर

By admin | Updated: February 9, 2015 23:06 IST

गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी

अमरावती : गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी बाजार भावाच्या चक्रव्यूहात अडकली आहे. योजनेसाठी खरेदी करावयाच्या जमिनीचे बाजारभाव एकरी २० लाखांच्याही पुढे गेल्याने जमिनी खरेदी करणे व लाभार्थ्यांना देणे या दोन्हीही कामात पूर्ण शिथिलता आली आहे.
वाढत जाणाऱ्या बाजारभावामुळे अत्यल्प किमतीत जमीन विकावयास कोणी तयार नाहीत व जमीन उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे वाढलेल्या बाजारभावाने या चांगल्या योजनेला घरघर लागली आहे. अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सध्या अडचणीत आहेत. लाभार्थीसाठी खरेदी करावयाच्या शेतजमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहे. त्या तुलनेत शासनाकडून जमिनीस दिले जाणारा बाजारभाव प्रती एकर तीन लाख रुपये इतका कमी असल्याने शासनाला जमिनीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात या कमी असलेल्याने योजनेस प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. २००४-२००५ मध्ये सुरु केलेल्या सबलीकरण योजनेस सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांतच जमिनी मिळण्याचे प्रमाण खालावले. ते २०११-१२ मध्ये अगदी शून्यावर आले आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या तीन लाख रुपये प्रतीएकर सरकारी भावामुळे जमिनी द्यावयास कोणी तयार होत नसल्याचा शेरा मारुन अहवाल व शिल्लक राहिलेला निधी सरकारकडे पाठविला गेला. या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी आता शासनस्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २००५ पासून २१६ लाभार्थींना ७६२ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षात परिस्थिती बिकट झाली असून आतापर्यंत केवळ २१६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, शासनाने जमीन खरेदी करताना ठरवून दिलेल्या दराच्या तुलनेत जमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने लाभार्थीना शेतजमिनी देण्यात अडसर येत असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)