हाती तलवार, चाकू घेऊन फेसबुकवर ‘पोस्ट’ करणाऱ्याचा पोलिसांनी घेतला शोध

By प्रदीप भाकरे | Updated: August 7, 2025 20:02 IST2025-08-07T20:00:39+5:302025-08-07T20:02:14+5:30

शस्त्रे केली जप्त : क्राइम युनिट दोनची कारवाई

Police search for man who posted on Facebook with sword and knife in hand | हाती तलवार, चाकू घेऊन फेसबुकवर ‘पोस्ट’ करणाऱ्याचा पोलिसांनी घेतला शोध

Police search for man who posted on Facebook with sword and knife in hand

अमरावती : हाती चाकू व तलवार घेऊन फेसबुकवर फोटो पोस्ट करणाऱ्या ३८ वर्षीय इसमाचा शोध घेत त्याच्याकडून ती शस्त्रे जप्त करण्यात आली. संतोष चतुर्भुज बजाज (३८, रा. कपिलवस्तूनगर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.
             

गुन्हे शाखा युनिट -२ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने ६ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. संतोष चतुर्भुज बजाज याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर तलवार व चाकू घेऊन फोटो पोस्ट करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्या राहत्या घरून तलवार व चाकू जप्त केला. आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Police search for man who posted on Facebook with sword and knife in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.