कौंडण्यपूर येथे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:01:02+5:30

अत्यावश्यक सेवा वगळता जर कोणी विनाकारण रस्त्यावर फिरायला बाहेर निघत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचे विभाजन करणारी वर्धा नदी ज्या गावातून जाते, असे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Police guard at the border of the district at Kundanipur | कौंडण्यपूर येथे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा पहारा

कौंडण्यपूर येथे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा पहारा

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेला प्राधान्य : जिल्ह्यात येण्याची परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : कोरोनाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली असून, अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही रस्त्याने फिरण्यास किंवा प्रवास करण्यास बंदी सरकारने आणली आहे. तसे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाईचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथेही पोलिसांचा कडक पहारा लावण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता जर कोणी विनाकारण रस्त्यावर फिरायला बाहेर निघत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचे विभाजन करणारी वर्धा नदी ज्या गावातून जाते, असे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे अमरावती ग्रामीण पोलीस विभागातर्फे बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्याची सीमा आहे. अकारण बाहेर निघणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी पुन्हा बाहेर निघू नये म्हणून त्यांना विविध प्रकारच्या शिक्षा देण्यात येत आहे. जर कोणी खोटे बोलून सिग्नल तोडत असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. बंदोबस्ताकरिता कुºह्याचे ठाणेदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पोलीस कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आलेली आहे.

Web Title: Police guard at the border of the district at Kundanipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.