पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची नागपुरात बदली, नवे आयुक्त कोण?
By प्रदीप भाकरे | Updated: May 13, 2025 22:17 IST2025-05-13T22:14:00+5:302025-05-13T22:17:33+5:30
राज्याच्या गृह मंत्रालयाने मंगळवारी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची नागपुरात बदली, नवे आयुक्त कोण?
प्रदीप भाकरे, लोकमत न्यूज नेटवर्क: अमरावतीचे शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये सहपोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने मंगळवारी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात रेड्डी यांच्या बदलीचा समावेश आहे. मात्र, त्याच वेळी अमरावतीचे शहर पोलीस आयुक्त कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
आयपीएस अधिकारी असलेले नवीन चंद्र रेड्डी यांनी २१ डिसेंबर २०२२ रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता. १ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली होती. त्यांच्या पदोन्नतीमुळे अमरावती शहर पोलीस आयुक्तालय देखील अपग्रेड झाले होते.
रेड्डी यांना अमरावती शहर आयुक्त म्हणून सुमारे दोन वर्ष पाच महिने असा यशस्वी कार्यकाळ मिळाला. गेल्या काही दिवसांपासून रेड्डी यांची बदली होईल असे संकेत मिळाले होते. आयपीएस अधिकारी असलेल्या डॉ. आरती सिंग यांच्याकडून त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. रेडी यांचा एकंदरीतच दोन वर्ष पाच महिन्यांचा कार्यकाळ यशस्वी राहिला आहे.