शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
2
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
3
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
4
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
5
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
6
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
7
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
8
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
9
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
11
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
12
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
13
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
14
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
15
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
16
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
17
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
18
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
19
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
20
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
Daily Top 2Weekly Top 5

'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:58 IST

Amravati : २१ व्या हप्त्याचा ९०.४१ शेतकऱ्यांना १८०८ कोटींचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता बुधवारी वितरित करणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार या लाभासाठी पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार राज्यात ९०,४१,२४१ शेतकरी पात्र आहेत व या शेतकऱ्यांच्या खात्यात १८०८.२५ कोटी रुपये बुधवारी जमा होणार आहेत. यामध्ये २० व्या हप्त्याच्या तुलनेत तब्बल ६,०९,९३० शेतकरी लाभार्थी कमी झाले आहेत.

यापूर्वी २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी ९६,५१,१७१ शेतकऱ्यांना दिला होता. यानंतर योजनेत अनेक फिल्टर लावण्यात आल्याने लाभार्थी संख्या कमी झाल्याची माहिती आहे. २१ वा हप्ता वितरित झाल्यानंतर किती शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ जमा झाला, यानंतर पात्र लाभार्थी संख्या समोर येणार आहे.

केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे वर्षाला सहा हजारांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत २० हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानंतर योजनेत अजून काही निकष जोडण्यात आले आहेत. यानुसार एका कुटुंबात एकालाच लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे ६.१० लाख लाभार्थी वगळल्याची शक्यता असल्याची माहिती आहे. 

योजनेतील लाभार्थी संख्या

२० हप्ता खातेदार - ९६,५१,१७१वितरित निधी - १९३०.२३ कोटी२१ हप्ता खातेदार - ९०,४१,२४१आवश्यक निधी - १८०८.२५ कोटी

यामुळे पात्र लाभार्थी संख्येत कमी

योजनेतील पात्र कुटुंबात पती, पत्नी व १८ वर्षांखालील मुले मिळून हा हप्ता आहे. मात्र, काही लाभार्थीनी पत्नीचीही नोंदणी केल्याची बाब केंद्राच्या निदर्शनात आलेली आहे. अशा स्थितीत संबंधित शेतकरी खातेदाराचा हप्ता बंद करून त्याच्या पत्नीला योजनेचा लाभ देण्याचे धोरण आहे, यासोबतच अन्य निकषांमुळे योजनेतील पात्र लाभार्थी संख्येत घट झाल्याची प्रशासनाची माहिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Kisan Scheme: 6.1 Lakh Beneficiaries Removed for 21st Installment

Web Summary : Over 6 lakh farmers are ineligible for the 21st PM Kisan installment. Stricter criteria, including one beneficiary per family, led to the reduction from 96.51 lakh to 90.41 lakh recipients. The installment of ₹1808.25 crore will be disbursed to eligible farmers.
टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीfarmingशेती