शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

वृक्षारोपणाचा खर्च लाखांत; जगली किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:23 IST

एकीकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कागदोपत्री वृक्षारोपण कार्यक्रम दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, एका पाहणीत रोपलेली झाडे जगलीच नाही, असे दिसून आले आहे.

ठळक मुद्देनावापुरतेच ठरले वृक्षारोपणत्याच त्या खड्ड्यांचा उपयोग

आॅनलाईन लोकमतअचलपूर : एकीकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कागदोपत्री वृक्षारोपण कार्यक्रम दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, एका पाहणीत रोपलेली झाडे जगलीच नाही, असे दिसून आले आहे. यामुळे वृक्षारोपणावर केलेला लाखोंचा खर्च कुचकामी ठरल्याचे चित्र आहे. झाडे जगण्यासाठी अधिकाºयांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना, याकडे मात्र कुणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे.शासन दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कोट्यवधी रुपयांची झाडे लावते. पण, वृक्षारोपणापुरताच हा कार्यक्रम मर्यादित राहतो. लावलेल्या झाडांना योग्य संरक्षण मिळत नाही. त्यांची निगा राखली जात नाही. त्यामुळे शासकीय योजनेचा केवळ पैसा खर्च होतो. पर्यावरण संवर्धनाला त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ७० ग्रामपंचायतींमध्ये २०१६-१७ या वर्षात करण्यात आलेल्या वृक्षारोपणापैकी जिवंत असलेल्या रोपट्यांची संख्या नगण्य आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत त्यांना मजुरांकडून पाणी टाकले असल्याचे दाखविले जात होते. पण त्यातील नगण्य झाडे शिल्लक असल्याची माहीती आहे.पाहणीसाठी समिती गठितसन २०१५-१६ व १६-१७ या साली वृक्षलागवडीतील किती झाडे शिल्लक आहेत, शिल्लक असलेल्या झाडांची उंची किती, वृक्षांची आजची स्थिती, अशा अनेक मुद्द्यांवर अवलोकन करण्यासाठी तत्कालीन सहायक गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे यांनी एका समितीचे गठण केले होते. यासंदर्भात एक तक्रार राहुल कडू यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांना केली. यावरून समिती गठित झाली.झाडे वाचविण्यासाठी ‘चिपको’ आंदोलन२०१० ते २०१३ या कालावधीत अचलपूर-परतवाडा शहरात २८ हजार ६०० झाडे लावण्यात आली. यासाठी १० लाख ९० हजार रुपये खर्च झाला. ही झाडे आता नाहीत. एका महामंडळाने अंजनगाव स्टॉप ते बैतुल स्टॉपवरील ३५ झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. ती झाडे तोडू नये, यासाठी आदिवासी पर्यावरण संघटनेच्या योगेश खानझोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिपको आंदोलन केले.नगरपरिषद अंतर्गत वृक्षारोपणाची चौकशी करू. अनियमितता असल्यास कारवाई होईलच. - सुनीता फिसके, नगराध्यक्ष, अचलपूर.