शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन लिकेज, दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: January 7, 2017 00:19 IST

तालुक्यातील ममदापूर येथे काही वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाइनला ठिकठिकाणी व थेट गटारात लिकेज आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : आरोग्याला धोका, कारवाईची मागणीतिवसा : तालुक्यातील ममदापूर येथे काही वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाइनला ठिकठिकाणी व थेट गटारात लिकेज आहेत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य मुकुंद पुनसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली आहे.वणी ममदापूर ग्रा.पं.चे सदस्य मुकुंद पुनसे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित तालुका प्रशासनाकडे तक्रार सादर केली आहे. ग्राम ममदापूर येथे पाणीपुरवठा योजने अंतर्गत सन २००७ ते २०१२ मध्ये पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. यावेळी सरपंच, सदस्य व सचिव यांनी कामाकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित ठेकेदाराने सदर पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे वारंवार पाईपलाईन लिकेज होत आहे. नागरिकांपर्यंत पाणी सुरळीत पोहोचत नाही, तर दुसरीकडे ही पाईपलाईन ग्रामपंचायतीच्या एका नालीमधून टाकण्यात आल्याने व पाईपलाईन लिकेज झाल्याने थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. नागरिकांना हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याची खंत मुकुंद पुनसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली आहे.दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावात साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले असून ग्रामपंचायतीनेदेखील लिकेज पाईपलाईनचे काम करण्याचा ठरावही घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, अद्याप लिकेज पाईपलाईनबाबत कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी तक्रारीतून केली आहे. पाईपलाईन टाकण्याच्या कामाकडे आजी-माजी सरपंचांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सुद्धा पुनसे यांनी तक्रारीतून केला असून याबाबत सरपंचांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)साथरोगाचा प्रादुर्भावदूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोटाचे तसेच अन्य विकारही या पाण्यामुळे संभवतो. गावकऱ्यांना या पाण्यामुळे आजाराची बाधा झाल्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.