शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा थडी येथे फडकविला उलटा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

प्रशासकांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, ध्वजारोहणाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल चांदूर बाजार (अमरावती) : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ...

प्रशासकांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, ध्वजारोहणाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल

चांदूर बाजार (अमरावती) : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना प्रशासक व सचिवांच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकविण्यात आला. याप्रकरणी काही नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढाकार घेतला. मात्र, प्रशासकाला प्रकरण दाबण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.

शासनाने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याकरिता ध्वजसंहिता निश्चित केली आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयावर ध्वजारोहण नियमानुसार होणे गरजेचे आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने आशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. असाच प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात घडला.

ग्रामपंचायतचे प्रशासक व विस्तार अधिकारी नारायण आमझरे यांनी ध्वजारोहण केले असता. चक्क राष्ट्रध्वज उलटा फडकल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रगीतसुद्धा झाले. ही बाब नंतर उपस्थितांच्या लक्षात येताच उलट फडकलेला तिरंगा खाली उतरवून पुनश्च फडकविण्यात आला. प्रशासकाच्या या गलथान कारभाराविरुद्ध गावातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढाकार घेतला होता. मात्र, प्रशासक व ग्रामसेवकांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसली तरी ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करताना उलटा तिरंगा फडकल्याचे छायाचित्र तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ध्वजारोहणावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, गणमान्य उपस्थित होते. याप्रकरणी विचारणा केली असता, ब्राह्मणवाडा थडीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी कोणतीही तक्रार झाली नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकाराबाबत पंचायत समिती प्रशासनात एकच तारांबळ उडाली होती. प्रशासक व सचिवांच्या हलगर्जीपणामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतील की, पाठराखण याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.