बडनेऱ्यात पेट्रोल पंप संचालकाची हत्या; हल्लेखोर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 00:14 IST2025-09-25T00:14:47+5:302025-09-25T00:14:56+5:30
अज्ञातांनी पेट्रोल पंप चालकाला भोकसले, जागेवरच मृत्यू

बडनेऱ्यात पेट्रोल पंप संचालकाची हत्या; हल्लेखोर फरार
अमरावती: बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गावरील हॉटेल रानमार जवळ एका पेट्रोल पंप संचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघड झाली आहे. मिलिंद मुरलीधर लाड (४६, राहणार जुनी वस्ती बडनेरा ) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या सर्वांगावर धारदार शास्त्राची घाव असून त्यांना रस्त्यात अडवून अज्ञातांनी त्यांना भोसकले.
बडनेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद लाड यांचे बडनेरा अंजनगाव मार्गावर पेट्रोल पंप आहे. रात्री साडेनऊ ते दहा च्या सुमारास ते पेट्रोल पंपाऊंड परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रथमदर्शनी लुटीतून ही हत्या घडली असावी अशी शक्यता बडनेरा पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरीया पोलीस उपायुक्त शाम घुगे व गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण, बडनेराचे ठाणेदार सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने नवरात्र उत्सव दरम्यान मोठी खळबळ उडाली आहे.