सध्या पेट्रोलचा प्रतिलिटर दर १०९.२८ पैसे, तर डिझेल ९८.९४ रुपये दर आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला असून, महागाईने कंबर मोडली आहे. त्यात ही पेट्रोलची दरवाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेच.
बॉक्स
पगर कमी, खर्चात झाली वाढ
कोरोनामुळे सर्व हॉटेल्स बंद होती. त्यामुळे काही महिने घरीच राहावे लागले. नंतर मालकाने चार तास कामावर बोलावले. त्यातून कसेतरी कुटुंब जगविले. आता अनलॉकमध्ये आणखी शिथिलता मिळाल्याने पूर्णवेळ काम मिळाले आहे. मात्र, वाढते इंधनदरामुळे वाहन चालवायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे.
- रमेश राठोड, नागरिक
--
मी कपड्याच्या दुकानात काम करीत होतो. मात्र, कोरोनाकाळात दुकान बंद झाल्याने अनेक दिवस घरीच राहावे लागले. मात्र, जगणे कठीण झाल्याने आता गवंडी कामावर जात आहे. त्यातून येणाऱ्या पैशात घरखर्च भागवित आहे. मात्र, दूर साईडवर कामाला जाण्याकरिता दुचाकी अनिवार्य असल्याने पेट्रोल ये-जा करण्यास परवडणारे नाही.
- शुभम जाधव
कोरोनामुळे खर्चात भर, पाचशेऐवजी हजार
कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक कमी झाली आहे. पूर्वी नागपूर, अकोला जाण्याकरिता २००, १५० रुपये लागायचे. मात्र, आता पेट्रोलचे दर वाढल्याने थेट ७०० रुपयांचे पेट्रोल वाहनात टाकावे लागत आहे. पूर्वी १०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये आठवडा निघायचा. मात्र, आता तीन दिवसात पेट्रोल टाकावे लागत आहे, असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांची आहे.
पॉइंटर
हा बघा फरक (दर प्रति लिटर)
विमानातील इंधर - ६६.४८ रुपये
पेट्रोल - १०९.२८ रुपये
शहरातील एकूण पेट्रोलपंप - ३५
दररोज लागणारे पेट्रोल - ६० हजार लिटर
शहरातील वाहने
दुचाकी - ३०००००
चारचाकी - ९५०००