शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चंचूपात्र नाडीवर, डोळा खिशावर

By admin | Updated: May 30, 2014 23:18 IST

प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या चंचूपात्रात एक विशिष्ट प्रकारचे द्रावण घेऊन त्या माध्यमातून शरीरातील हालचाली दर्शविणे, मग, आजाराचे निदान करणे इतकेच नव्हे तर आजार पूर्णत: बरा झाल्यावरच फी द्या,

गॅरंटीचा दावा : भोंदू वैद्यांकरवी राजरोस लूट, अप्रमाणित औषधींचा पुरवठाइंदल चव्हाण - अमरावतीप्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या चंचूपात्रात एक विशिष्ट प्रकारचे द्रावण घेऊन त्या माध्यमातून शरीरातील हालचाली दर्शविणे, मग, आजाराचे निदान करणे इतकेच नव्हे तर आजार पूर्णत: बरा झाल्यावरच फी द्या, असे विश्‍वासदर्शक आमिष देऊन गोरगरीब व निरक्षर नागरिकांची लूट करण्याचे प्रकार  ग्रामीण भागात तळ ठोकून बसलेल्या बोगस वैदुंकडून सर्रास सुरू आहेत.लोकमतने नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील मांजरी म्हसला या गावी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नुकताच उघडकीस आला.  दिवसेंदिवस आजारांचे प्रकार वाढत आहेत. उपचार करूनही आजार बरे होत नसल्याने आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या बेजार झालेले रुग्ण  तोतया डॉक्टरांच्या आमिषाला बळी पडतात. हे तोतया डॉक्टर आजार बरा झाल्यावरच पैसे द्या,असे छातीठोकपणे सांगत असल्याने हैराण झालेल्या रूग्णांचा त्यांच्यावर विश्‍वास बसतो. वैदूंनी रूग्णांची तपासणी करण्यासाठी नवाच फंडा शोधून काढला आहे. चंचूपात्रात एक द्रावण भरून ते मनगटाच्या नाडीवर ठेवायचे आणि त्यामुळे द्रावणात होणार्‍या चढउतारांवरून आजाराचे निदान करायचे, अशी पध्दत या वैदुंची आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी चंचूपात्रातील द्रावणात होणारे चढ-उतार पाहून रूग्णांचा चटकन् वैदूंवर विश्‍वास बसतो. अनेकदा रुग्ण भावनिक होतात व वैदूंनी दिलेल्या औषधोपचारांवर त्यांचा विश्‍वास बसतो. धावपळीचे जीवनमान, पर्यावरणाचे ढासळते संतुलन, व्यसने आदींमुळे विविध आजार बळावू लागले आहेत. असाध्य आजारांसाठी डॉक्टरांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र, कायमस्वरूपी ईलाज होत नाही. त्यामुळे लोक तोतया डॉक्टरांना बळी पडतात.