साहेब आमच्या कडे लक्ष द्या; संतप्त महिलांनी अडवला अजित पवारांचा ताफा; कळमखार गावातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 21:43 IST2022-08-20T21:41:04+5:302022-08-20T21:43:18+5:30
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गाडीतून उतरून महिलांशी संवाद साधला.

साहेब आमच्या कडे लक्ष द्या; संतप्त महिलांनी अडवला अजित पवारांचा ताफा; कळमखार गावातील प्रकार
नरेंद्र जावरे -
अमरावती- विरोधी पक्षनेते अजित पवार आज मेळघाट दौऱ्यावर होते. त्यांनी धारणी तालुक्यातील कळमखार गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची पाहणी केली. यावेळी पावसाळ्यामध्ये आपल्या घरात नालीचे पाणी जात असल्याचे म्हणत, येथील महिलांनी अजित पवार यांचा ताफा आडवून रोष व्यक्त केला. तसेच मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोपही केला.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गाडीतून उतरून महिलांशी संवाद साधला. तसेच, अजीत दादा यांनी या महिलांना त्यांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी, आमच्या घराकडे जाऊन पाहा, असा हट्ट महिलांनी अजित दादांकडे धरला होता.