शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला प्रवासी, कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानाच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे टप्याटप्याने फेऱ्या कमी करण्यात आल्या. २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एसटीची चाके थांबली. जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून कर्तव्य बजावले.

ठळक मुद्देआर्थिक घडी रुळावर येईना : दोन महिन्यांपासून वेतन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना आपत्तीत राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या एसटी बसेस सुरू झाल्या असल्या तरी बºयाच फेऱ्या तोट्यात धावत आहेत. अशातच कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नाहीत. त्यामुळे एसटीला प्रवाशांची, तर कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात भारमान वाढवा अभियान सुरू करण्यात आले. परंतु अभियानाच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कोरोनामुळे टप्याटप्याने फेऱ्या कमी करण्यात आल्या. २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे एसटीची चाके थांबली. जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून कर्तव्य बजावले. सध्या पूर्ण क्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. सध्या एसटी बसेस २५ ते ३० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा एस.टी.बसेस धावत असल्या तरी प्रवासी नसल्याने फेऱ्या मर्यादेतच आहेत. वेतनाची घडी सध्या विस्कटली आहे. कोरोना आपत्तीत मार्च महिन्यात ७५ टक्के, एप्रिल महिन्यात शंभर टक्के, मे महिन्यात ५० टक्के, जून महिन्यात शंभर टक्के वेतन झाले. शासनाने केलेल्या मदतीमुळे मार्च व मे महिन्यातील उर्वरित वेतनही मिळाले. परंतु सध्या जुलै व ऑगस्टचे वेतन मिळाले नाही. सप्टेंबर महिना संपला तरी अद्याप वेतनाचा पत्ता नाही. एस.टी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नातून दिले जाते. परंतु सध्या उत्पन्न घटल्याने ही वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनस्तरावरू न मदतीचा हात मिळणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील चित्रजिल्ह्यात फेब्रुवारीत एसटी महामंडळाला सरकारी ४० लाख रुपये उत्पन्न १ लाख ४० हजार किलो मीटर अंतर कापल्यानंतर मिळत होते. ते सध्या सप्टेंबरपर्यंत ५० हजार किलोमीटर ८ आगारांतील १५० गाड्यांनी ५० हजार अंतर कापल्यानंतर १०.३० लाख मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या उत्पन्न बरेच घटल्याचे चित्र आहे.कोरोना आपत्तीत कर्तव्य बजावणाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये भत्ता मिळालेला नाही. कोरोना बळींच्या वारसांना मदत मिळाली नाही. वेतनही नाही.- मोहित देशमुख, विभागीय सचिव

टॅग्स :state transportएसटी