नामांकित शाळाप्रवेशासाठी पालकांचा आरटीई घोटाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:58+5:30
संबंधित पालकांनी सादर केलेल्या पत्त्यावर रहिवाशी आहेत किंवा नाही याची चौकशी करण्याचे निर्देश सीइओंनी शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार २८ पालकांच्या रहिवासी पत्त्याची यापूर्वी तपासणी करण्यात आलेली आहे. संबंधिताना कल्पना न देता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीव्दारे २१ आॅगस्टला शहरानजीकच्या गावात व तेथून जवळच असलेल्या नामांकित शाळेत प्रत्यक्ष जावून चौकशी करण्यात आली.

नामांकित शाळाप्रवेशासाठी पालकांचा आरटीई घोटाळा?
जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सध्या पात्र ठरलेल्या पाल्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया शाळास्तरावर सुरू आहे. यामध्ये नामांकित शाळेत प्रवेशासाठी रहिवाशाचे खोटे करारनामे दाखवून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न काही पालकांनी केला आहे. सीईओ अमोल येडगे यांनी करविलेल्या चौकशीत पालकांचा हा घेटाळा उघड झाला आहे.
संबंधित पालकांनी सादर केलेल्या पत्त्यावर रहिवाशी आहेत किंवा नाही याची चौकशी करण्याचे निर्देश सीइओंनी शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार २८ पालकांच्या रहिवासी पत्त्याची यापूर्वी तपासणी करण्यात आलेली आहे. संबंधिताना कल्पना न देता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीव्दारे २१ ऑगस्टला शहरानजीकच्या गावात व तेथून जवळच असलेल्या नामांकित शाळेत प्रत्यक्ष जावून चौकशी करण्यात आली. यामध्ये १० पालकांनी घरमालकांचे करारनामे जोडले असले तरी ते संबंधित ठिकाणी राहत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आरटीई प्रवेश घेण्यासाठी जोडलेले रहिवाचे पुरावे हे संशयास्पद असल्याचे सीईओंकडे सादर केलेल्या या चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले. या कारनाम्यासाठी संबंधित पालकांना नोटीस बजाविण्याचे आदेश सीईओंनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
संबंधित पालकांनी त्यांच्या रहिवासी पुराव्याचे ठोस दस्ताऐवज सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. या पालकांना २८ ऑगस्टपर्यत लेखी खुलासा सादर करावा लागणार आहे. समाधानकारक ऊत्तरे नसल्यास संबंधित पाल्याचे प्रवेश रद्द करून दोषी पालकांवर प्रशासनाकडून कारवाईसुध्दा केली जाणार आहे.
दुर्बल घटकांसाठी सोय
मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालकांच्या शिक्षण हक्क कायद्याने (आरटीई) खासगी शाळांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे अनिवार्य आहे. त्यानुसार सन २०२०-२१ या वर्षातील शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यात २४२ शाळांमध्ये २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ४५६ विद्यार्थी या सोडतीमध्ये प्रवेशास पात्र ठरले आहेत. या सर्वाना तस्े मॅसेज देखील पाठविण्यात आलेले आहेत.अद्याप २३५० विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. कागदपत्रांची पडताळणी शाळा स्तरावर केली जात आहे. २५ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रवेशाचे संपूर्ण नियंत्रण सोपविण्यात आले आहे.
शाळा प्रवेशासंदर्भात संदेश आल्यानंतर त्या दिनांकाला सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकीत प्रत घेऊन शाळेत उपस्थित राहून व कागदपत्रांच्या पडताळणीचे अधीन राहून तात्पुरता प्रवेश घेवूण शाळेत हमीपत्र द्यावे लागत आहे.
शाळेच्या संदेशावर विसंबून न राहता आरटीई पोर्टलवर बालकांचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाला याची खात्री करावी, असे सांगण्यात आले. पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळली किंवा आरटीई पोर्टलवर चुकीची माहिती भरली असल्यास कारवाई करण्याचे शिक्षण संचालनालयाने निर्देश आहेत.
दरम्यान आरटीई प्रवेशाचा लाभ गरजूनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये चूकीची माहिती सादर करून लाभ घेतल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अमोल येडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
- तर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालकांवर, घरमालकांवर कारवाई
आरटीई प्रवेशप्रक्रियेत रहिवासी पुराव्यासाठी घरमालकांसोबत करारनामा केल्याचे दर्शवून प्रत्यक्ष तेथे पालक राहत नसल्याचा संशय आहे. त्यासंबंधाने विशेष पथकाने दोनवेळा नजीकच्या गावात खातरजमा केली. दहा पालक ांनी जोडलेले रहिवासी पुरावे संशयास्पद असल्याने त्यांना दोन दिवसांत खुलासा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. घोटाळा उघड झाल्यास प्रवेश रद्द करून पालकांवर, घरमालकांवर कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
शाळास्तरावर पडताळणी
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया यंदा कोरोना संकटामुळे शाळा स्तरावर राबविली जात आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेश अर्जासोबत जोडण्यात आलेल्या दस्तऐवजाची पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने विद्यार्थ्याना नामांकीत शाळेत प्रवेश दिले जात आहेत.