शिवशाही बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने शिवशाही बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, आग लागू नये म्हणून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा केल्यानंतर धूर निघणे बंद झाले व पुढील अनर्थ टळला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत महिन्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव्य विज्ञान या दोन विभागांच्या अधिष्ठाता पदांसाठी भरती करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने यात आरक्षण रोस्टर प्रणाली लागू केली नाही. ...
स्थानिक मसानगंज परिसरात जुन्या टायरला लागलेल्या आगीने दुकानासह दोन घरांना कवेत घेतले. ही घटना गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास मनपा हिंदी स्कूल-२ नजीक घडली. अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठी हानी टळली. ...
तीन दिवसांपूर्वी अकोल्याहून निघालेल्या ९२ वर्षीय कुसुमबाई यांना अखेर बुधवारी अमरावती येथील हमालपुरातील नातवाचे घर मिळाले. रॉयली प्लॉट परिसरातील व्यापारी राजेश गुल्हाने यांनी कुसुमबार्इंना माणुसकीचा आधार देऊन त्या वृद्धेला नातवाच्या घरापर्यंत पोहोचून ...
सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जून महिन्यात ३५० गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सद्यस्थितीत ५५ गावांमधील एक लाख दोन हजार नागरिकांची ५४ टँकरवर मदार आहे. पाणीटंचार्ईवर तात्पुरता उपाय म्हणून ३१४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले, त्यावर २५५ गावांची तहान भागविली ...
मुस्लिम धर्मात रमजान महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिनाभर उपवास ठेवून ईश्वराची प्रार्थना करतात. हातून कळत -नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित्त करीत असलेले कैदीदेखील यात मागे राहिले नाहीत, याची प्रचिती येथील मध्यवर्ती कारागृहात ब ...