सहा तालुक्यातील नदीनाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:26 PM2019-07-29T23:26:04+5:302019-07-29T23:28:50+5:30

जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड आहे. शनिवारी सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यात दशकातला रेकार्ड तुटला. तब्बल १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने नदी-नाले ओव्हर-फ्लो झाले.

Floods of river in six talukas | सहा तालुक्यातील नदीनाल्यांना पूर

सहा तालुक्यातील नदीनाल्यांना पूर

Next
ठळक मुद्दे२७ गावांचा संपर्क तुटलासिपनावरील उतवली गावाजवळ पूल वाहून गेलाभिंती कोसळल्याने चार जखमीसहा तालुक्यातील तीन पुलांचे नुकसानपेढी नदीलाही पूर, पिके बाधितफैलढाणा, हरिसाल, दुनीमध्ये घरे वाहून गेलीतहसील प्रशासनाद्वारे पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड आहे. शनिवारी सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यात दशकातला रेकार्ड तुटला. तब्बल १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने नदी-नाले ओव्हर-फ्लो झाले. धारणी तालुक्यात सिपना नदीला पूर आल्याने दिया व उतावली दरम्यानचा पूल वाहून गेला. यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले, तर तीन घटनांमध्ये घरांच्या भिंती कोसळल्याने चार व्यक्ती जखमी झाल्या. शहानूर नदीपात्रात एक युवक बुडाला. तीन ठिकाणी पूल खचल्याने व दोन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.
चिखलदरा तालुक्यात १४८.९ व धारणी तालुक्यात ८५.२ मिमी अशी पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली. या तालुक्यांसह अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील नदी-नाल्यांनाही पूर आलेला आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक ४२.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात २१.८ मिमी, भातकुली १९ मिमी, नांदगाव खंडेश्वर ११ मिमी, चांदूर रेल्वे ४.९ मिमी, धामणगाव ८.४ मिमी, तिवसा ८.४ मिमी, मोर्शी ४०.६ मिमी, वरुड ५३.५ मिमी, अचलपूर ६०.९ मिमी, चांदूरबाजार ६२.१ मिमी, दर्यापूर ३१.८ मिमी व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४२ मिमी पावसाची नोंद झाली. चार दिवसांपासून जिल्ह्यात झड असल्याने पावसाची सरासरी सुधारली असली तरी अद्यापही सात तालुक्यांत पाऊस ७५ टक्क््यांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३०९.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ७६.४ आहे. यामध्ये ९५.६ टक्के पाऊस चांदूर बाजार तालुक्यात झालेला आहे. अमरावती तालुक्यात ८३ टक्के, भातकुली ४८.४, नांदगाव खंडेश्वर ५३.३, चांदूर रेल्वे ७२.६, धामणगाव रेल्वे ७६, तिवसा ६३, मोर्शी ६५.१, वरूड ५६.९, अचलपूर ९५.२, दर्यापूर ७०.७, अंजनगाव सुर्जी ८६.४, धारणी ९३.९, तर चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या ९५.३ टक्के पाऊस कोसळला आहे.
१२ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यात १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये चिखलदरा २१७, टेंब्रुसोडा ११७, सेमाडोह २०७.४, धारणी १०९, धूळघाट ९८, हरिसाल ९०, चांदूर बाजार ७१, तळेगाव मोहणा ९५, ब्राम्हणवाडा थडी ७४, अचलपूर ९०, परतवाडा ८० व राजुराबाजार ६५ मिमी पाऊस कोसळला.
याव्यतिरिक्त चुरणी ५४.२, सावलीखेडा ४५, सातेगाव ४३, भंडारज ५०, विहिगाव ५१, अंजनगाव सुर्जी ५२, कोकर्डा ४१, दर्यापूर ३५, वडनेरगंगाई ५४, येवदा ३८, बेलोरा ४८, करजगाव ५७, आसेगाव ४२, शिरजगाव कसबा ४८, परसापूर ३८, रासेगाव ६३, पथ्रोट ६२, वरूड ५२, बेनोडा ४४, लोणी ५५ शेंदूरजनाघाट ४१, पुसदा ६०, अंबाडा ६२, हिवरखेड ४८ व रिद्धपूर मंडळात ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तीन घरे कोसळली; चार जखमी
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तीन तालुक्यांमध्ये घराची भिंत कोसळून चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात कसबेगव्हाण येथे घराची भिंत कोसळल्याने बानोजी सलाबतखाँ मुदताजबी सलाबतखाँ या जखमी झाल्या, तर सोनू भासकर यांचा पाय फॅक्चर झाला आहे. चांदूरबाजार तालुक्यात वसंता धुर्वे यांच्या घरांची भिंत कोसळून भाग्यश्री उईके ही चिमुकली गंभीर जखमी झाली तसेच वैष्णवी अनिल उईके व विमल ओझालाल धुर्वे जखमी झाले आहेत. धारणी तालुक्यात १० घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अचलपूर तालुक्यात सावळी, गौरखेडा व इतर गावांमध्ये काही घरांचे नुकसान झाले असल्याची प्र्राथमिक माहिती आहे. तलाठ्यांद्वारे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू अहे.
असा झाला सहा तालुक्यात कहर
अतिवृष्टीमुळे अचलपूर तालुक्यात भुलेश्वरी नदीला महापूर
परतवाडा- अंजनगाव राज्य मार्ग बंद. पथ्रोट, शिंदीमध्ये पाणी शिरले.
धारणी, चिखलदऱ्यात अतिवृष्टी.
आदिवासींचे जीवनमान विस्कळीत.
सपन प्रकल्पाची दारे उघडली. पूर्णा, शहानूर, चंद्रभागातील जलसाठा वाढला
धारणी तालुक्यातील तापी, गडगा, सिपना नद्यांना पूर
चिखलदरा तालुक्यात सलोना ते लोणाझरी रस्त्यावर दरड कोसळली.
अचलपूर तालुक्यातील चमक येथील तीन बंधारे गेले वाहून
खरपी ते परतवाडा मार्गातील पूल खचला. वाहतूक खोळंबली.
पर्यायी मार्ग पाण्याखाली आल्याने अमरावती-मोर्शी वाहतूक बंद.
दिया-बैरागड व धारणमहू-ढाकरमल मार्गावरील पूल खचला.
भातकुली तालुक्यातील पेढी नदीला पूर. नदीकाठची पिके बाधित.

Web Title: Floods of river in six talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.