या नैसर्गिक आपत्तीच्या महिनाभरानंतर केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी. सिंग यांनी शुक्रवारपासून तीन दिवस पश्चिम विदर्भातील बाधित खरिपाची पाहणी केली. यामध्ये त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी जाणून घेतली. त्यानंतर जिल्ह्यात ...
विकासाकडे वेगाने वाटचाल करीत असलेल्या अमरावतीमध्ये कायमस्वरूपी बेघरांची समस्याही मोठी आहे. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या आडोशाला किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर निद्रा पुरी करावी लागत आहे. अशा परिस्थितीतील वृद्ध व बालकांची आबाळ होते. त् ...
सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. राजकीय वातावरण पाहता, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. तिन्ही प ...
राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही. ...
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिलेल्या निवेदनानुसार, बडनेऱ्यातील पाच बंगला राठीनगर येथील संतोष भटकर यांच्या खासगी जागेवर हे मोबाईल टॉवर उभारणीचा प्रस्ताव आहे. मात्र, हे टॉवर उभारू नये, याकरिता ९ ऑक्टोबर व १५ नोव्हेंबर रोजी स्थानिकांनी महापालिका ...
राजकीय मंडळीच नव्हे, तर अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वांमध्ये एकच चर्चा होत आहे - कोणता सदस्य अध्यक्ष होणार? नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १६ आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गात २० पैकी दोन जागा रिक्त असल्यान ...
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून ऑनलाइन, ऑफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक ...
१० मिनीटांच्या अवधीत युवा स्वाभिमानच्या सुमती ढोके, शिवसेनेचे राजेंद्र तायडे, बसपाचे चेतन पवार, एमआयएमचे अब्दूल नाजीम अब्दूल रऊफ यांनी उमपौरपदाचे अर्ज मागे घेतले. कुसूम साहू यांचा एक अर्ज बाद झाला. या पदासाठीही हात उंचावून मतदान करण्यात आले. यामध्ये ...