जिल्ह्यात तीन केंद्रांमध्ये शिवभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:46+5:30

योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभाथ्यार्ला दिली. वरण, भात, चपाती, भाजी आदी पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला. शहरात तीन केंद्रांवर रोज प्रत्येकी १०० थाळी १० रुपये प्रतिदराप्रमाणे विक्रीस परवानगी दिल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.

Shiv Bhojas in three centers in the district | जिल्ह्यात तीन केंद्रांमध्ये शिवभोजन

जिल्ह्यात तीन केंद्रांमध्ये शिवभोजन

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : गरजू, गरिबांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी उपाहारगृहात झाला.
बाजार समितीसह अमरावती बसस्थानकातील उपाहारगृह, पीडीएमसी येथे शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर, संचालक प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोकाटे, प्रवीण बिचकुले, उमेश गोरडे, मिलिंद तायडे, प्रवीण भुगूल, सचिव दीपक विजयकर, धीरज कोकाटे, राजेद्रकुमार भटकर आदी उपस्थित होते.
योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभाथ्यार्ला दिली. वरण, भात, चपाती, भाजी आदी पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला. शहरात तीन केंद्रांवर रोज प्रत्येकी १०० थाळी १० रुपये प्रतिदराप्रमाणे विक्रीस परवानगी दिल्याचे पुरवठा विभागाने सांगितले. या सर्व ठिकाणांवरून गरजूंनाच लाभ दिला जातो काय, याचे नियंत्रण ऑनलाईन केले जाणार आहे. पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी आठवड्यात एकदा, जिल्हापुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी आदींनी १५ दिवसांत एकदा व जिल्हाधिकारी, नियंत्रक शिधावाटप यांनी महिनाभरात एकदा तरी या केंद्रांना भेटी देऊन आढावा व अहवाल सादर करण्याचे अवर सचिवांचे निर्देश आहेत.

केंद्रावर या सुविधा, दक्षता आवश्यक
शिवभोजन थाळी बनविण्यासाठी स्वतंत्र किचन, स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जावे, वापरायची भांडी स्टेनलेस स्टिलची असावी, कर्मचाऱ्यांच्या हाताची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता असावी, तयार केलेले अन्नपदार्थ स्टिलच्या भांड्यात साठविले जातील. शिळे वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. खाद्यपदार्थ दूषित होणार नाही. आवश्यकतेनुसार फ्रिजचा वापर, पिण्यासाठी तसेच अन्नपदार्थ तयार करण्यासाठी फिल्टर्ड, पिण्यायोग्य पाण्याचा वापर, स्वच्छ टेबल, खुर्चीची व्यवस्था या सुविधा व दक्षता आवश्यक आहे.
\४अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी या केंद्रावरील अन्नाचा दर्जा उत्तम राखण्याच्या दृष्टीने व अन्नातील भेसळ रोखण्यासाठी बाजारातून लागणारे साहित्य खाण्यायोग्य असल्याबाबतचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश पुरवठा विभागाचे अवर सचिव दीपक केंदे्र यांनी दिले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करणे, भोजनालय परिसरात डास कीटक आदींची वाढ होऊ न देणे व परिसर स्वच्च ठेवण्याविषयी मार्गदर्शन करण्याचे तसेच आरोग्य विभागाने पोषक तत्त्व असलेल्या भाज्यांची निवड करण्याचे प्रशिक्षण या केंद्रचालकांना द्यावे, असे निर्देश आहेत.

Web Title: Shiv Bhojas in three centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.