अनिल सदावर्ते, विजय अमृतकर उत्कृष्ट कर्मचारी, राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 06:10 PM2020-01-27T18:10:40+5:302020-01-27T18:10:47+5:30

महावितरणच्या स्थानिक विद्युत भवनात प्रजासत्ताकदिनी अमरावती परिमंडळातील कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

Anil Sadawarte, Vijay Amritkar Excellent staff | अनिल सदावर्ते, विजय अमृतकर उत्कृष्ट कर्मचारी, राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

अनिल सदावर्ते, विजय अमृतकर उत्कृष्ट कर्मचारी, राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

Next

अमरावती : महावितरणच्या स्थानिक विद्युत भवनात प्रजासत्ताकदिनी अमरावती परिमंडळातील कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचा-यांच्या प्रावीण्यप्राप्त पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटपही यावेळी करण्यात आले. मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

याप्रसंगी महावितरणमध्ये उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे साखरा (जि. यवतमाळ) केंद्राचे सहायक अभियंता अनिल लक्ष्मणराव सदावर्ते व शेगाव शाखा कार्यालय (अमरावती) येथील प्रधान तंत्रज्ञ विजय मारोतराव अमृतकर यांना महावितरण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशस्तिपत्र, बॅज व रोख, असे पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय वीज कर्मचा-यांच्या दहावी आणि बारावीत प्रावीण्य मिळविणा-या कर्मचा-यांच्या एकूण ३८ पाल्यांना परिमंडळ स्तरावर शिष्यवृत्तीचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे, सहाय्यक महाव्यवस्थापक रुपेश देशमुख, कार्यकारी अभियंता भारतभूषण औगड, प्रतीक्षा शंभरकर, आनंद काटकर, प्रणाली विश्लेषक नितीन नांदूरकर, प्रभारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक मनीष भोपळे, सुहास देशपांडे, यज्ञेश क्षीरसागर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Anil Sadawarte, Vijay Amritkar Excellent staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.