शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:20 PM

कमी दाबाचा पट्टा नागपूर, वर्धाकडे पश्चिमेकडून वायव्यकडे सरकत आहे. येत्या २४ तासांत कमजोर होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत येत्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

ठळक मुद्देसार्वत्रिक पाऊस : २४ तासांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कमी दाबाचा पट्टा नागपूर, वर्धाकडे पश्चिमेकडून वायव्यकडे सरकत आहे. येत्या २४ तासांत कमजोर होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत येत्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या २४ तासात सहा महसूल मंडळात अतिवृष्टीसह जिल्ह्यात सार्वत्रिक सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद झाली.मागील तीन आठवड्यांपासून खंड असलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुनरागमन केले आहे. या पावसाने खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १ जून ते १७ आॅगस्ट या कालावधीत ५४३ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ४२३ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ८४.५ आहे, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५६.३ टक्के पाऊस या कालावधीत पडला. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३६ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक १०८.४ मिमी पाऊस सावलीखेडा मंडळात, सेमाडोह ८७.६, हरिसाल ८०.२, धारणी ७०, निंभा ९०.४, तर भातकुली मंडळात ७७.६ मिमी पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात सर्वाधिक १३८.८ टक्के म्हणजेच ६८५ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला, तर १११ टक्के म्हणजेच ५६० मिमी पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात झाला. या दोनच तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. उर्वरित १२ तालुक्याची सरासरी माघारली आहे. सर्वात कमी ६३ टक्केच पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात ४३४ मिमी, भातकुली ३८४.८, नांदगाव खंडेश्वर ६८५.२, चांदूर रेल्वे ५५९.३, धामणगाव रेल्वे ४२७, तिवसा ३८६, मोर्शी ३८०.८, वरूड ४४४, अचलपूर ३६५.९, चांदूर बाजार ३७९.१, दर्यापूर ४१९, अंजनगाव सुर्जी ३३३.३, धारणी ६०० व चिखलदरा तालुक्यात ६२४.८ मिमी पावसाची नोंद झाली.अनिल बंड यांच्या माहितीनुसार, १८ व १९ आॅगस्टला हलका ते मध्यम पाऊस, २० व २१ ला बहुतेक ठिकाणी सार्वत्रिक स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस, २२ ते २४ दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलका पाऊस होणार आहे.सार्वत्रिक दमदार पावसाचे पुनरागमनमागील २४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक ३६ मिमी पाऊस पडला. यामध्ये अतिवृष्टीचे पाच मंडळ वगळता, अमरावती मंडळात ५२.२ मिमी, वडाळी ५५.२, नवसारी ४८.४, वलगाव ६१.३, खोलापूर ६१.३ नामदगाव खमडेश्वर ५६, दाभा ५२, खोलापूर ६१.३, नांदगाव खंडेश्वर ५६, दाभा ५२, धानोरा गुरव ५९, माहुली चोर ४१, लोणी ५५, पापळ ६२, शिवनी ५८, मंगरूळ चव्हाळा ५७, चांदूर रेल्वे ४९, घुईखेड ४२, सातेफळ ४७.२, पळसखेड ४५, अंबाडा ४१, चांदूर बाजार ५२, बेलोरा ४२, तिलोरी ४३, धूळघाट ५१, चिखलदरा ५४, टेंभुरखेडा ४५ व चुरणी महसूल मंडळात ४१ मिमी पावसाची नोंद झाली.