अमरावतीत एनआरसीला विरोध; आंदोलनात लाठीचार्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:05 PM2020-01-24T18:05:20+5:302020-01-24T18:10:09+5:30

१५ आंदोलक 'डिटेन', पाच जखमी : महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद 

Opposition to NRC, CAA, NPR in Amravati | अमरावतीत एनआरसीला विरोध; आंदोलनात लाठीचार्ज 

अमरावतीत एनआरसीला विरोध; आंदोलनात लाठीचार्ज 

googlenewsNext
ठळक मुद्दे एनआरसी, सीएए आणि एनपीआर या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी बंद पुकारला.पोलिसांनी १५ आंदोलकांना 'डिटेन' केले. एका व्यापारी प्रतिष्ठानावर दगड भिरकावल्याने अमरावती पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला.

अमरावती - एनआरसी, सीएए आणि एनपीआर या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी बंद पुकारला. यावेळी एका व्यापारी प्रतिष्ठानावर दगड भिरकावल्याने अमरावतीपोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान प्रचंड खळबळ उडाली. लाठीचार्जमध्ये पाच आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी १५ आंदोलकांना 'डिटेन' केले. शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात पुकारलेल्या बंददरम्यान शहरातील काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली. यादरम्यान इर्विन चौकात एकत्र झालेल्या आंदोलकांनी नारेबारी करीत उघडी प्रतिष्ठाने बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी एका आंदोलकाने व्यापारी प्रतिष्ठानावर दगड भिरकावला. यावेळी त्या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने आंदोलक सैरावैरा पळाले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. 

काही संतप्त आंदोलकांनी नारेबाजी करीत शहराकडे कूच केली. त्यामुळे पोलिसांनी लाठ्यांचा धाक दाखवून आंदोलकांना ताब्यात घेतले. लाठीचार्जमध्ये पाच आंदोलक जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेनंतर आंदोलकांमध्ये पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त होताना दिसून आला.
 

Web Title: Opposition to NRC, CAA, NPR in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.