वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध

By Admin | Updated: March 6, 2015 00:46 IST2015-03-06T00:46:40+5:302015-03-06T00:46:40+5:30

महावितरण कंपनीने ४७१४ कोटींच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.

Opponents of the electricity hike | वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध

वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध

अमरावती : महावितरण कंपनीने ४७१४ कोटींच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. यापूर्वी महावितरणने २००९-२०१० मध्ये सहा तर २०११-२०१४ मध्ये आठ वेळा वीज दरवाढीचा शॉक सामान्य ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे नव्याने वीज दरवाढीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजकांनी शुक्रवारी अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन वीज दरवाढीला कडाडून विरोध केला. वीज दरवाढ केल्यास उद्योगधंदे बंद होण्याचे संकेत देण्यात आले.
येथील एमआयडीसी इंडस्ट्रियल असोशिएशन व सातुर्णा औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांनी प्रस्तावित वीज दरवाढीमुळे मागासलेल्या विदर्भातील औद्योगिक क्षेत्र भविष्यात संपुष्टात येण्याची भीती वर्तविली जात आहे.

Web Title: Opponents of the electricity hike