समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार, सात जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 11:30 IST2023-02-28T11:29:53+5:302023-02-28T11:30:54+5:30

नाशिकहून परत येत होते नागपूर येथील मुळेकर कुटुंब

One killed, seven injured in car accident on Samriddhi Highway | समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार, सात जखमी

समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार, सात जखमी

धामणगाव रेल्वे (अमरावती) : त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून समृद्धी महामार्गाने परत येत असताना धामणगावजवळ एसयूव्हीचे नियंत्रण सुटल्याने दर्शनार्थींच्या कुटुंबातील एक जण जागीच ठार, तर सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.

पोलिस सूत्रांनुसार, हरिभाऊ श्यामराव मुळेकर (६०, रा. वडगाव उमरी, ता. नरखेड, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. मुळेकर व अन्य एक कुटुंब त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून एमएच १२ पीक्यू १२०८ क्रमांकाच्या एसयूव्हीने समृद्धी महामार्गाने नागपूर जिल्ह्यातील गावाकडे जात असताना धामणगावनजीक कॅनल क्रमांक ८ नजीक वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ते रस्ता दुभाजकाला धडकले.

या अपघातात हरिभाऊ मुळेकर जागीच ठार झाले, तर वाहनात त्यांच्यासमवेत असलेल्या दोन कुटुंबातील सात जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. यात लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेचा अधिक तपास दत्तापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे करीत आहेत.

Web Title: One killed, seven injured in car accident on Samriddhi Highway