शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

ट्रक-एसटी धडकेत एक ठार, 27 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

चौफुलीवरून धिम्या गतीने जाणाऱ्या एसटीला भरधाव ट्रकने सुमारे पन्नास ते साठ फूट फरफटत नेले. या धडकेनंतरही चालकाने एसटीचे संतुलन कायम ठेवत ती रस्त्याच्या खाली सुरक्षित उतरविली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच ठाणेदार हेमंत ठाकरे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिवणी, शिंगणापूर व नांदगाव खंडेश्वर येथील बरेच सामाजिक कार्यकर्ते अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. अपघात घडवून आणणाऱ्या ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ रोडवरील शिंगणापूर फाट्याच्या चौफुलीवर ट्रक व एसटी अपघातात एक प्रवासी ठार, तर २७ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. पांडुरंग बोडखे (७४, रा. कवठा) यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशिक खडसे (रा. पाथ्रट गोळे), पार्वताबाई पोहनकर (रा. पिंपरी कलंगा), मुमताज बेगम (रा. अमरावती), अरुणाबाई अमुने (रा. पुसद), अनिकेत राठोड (रा. पुसद), कुसुम पोहनकर (रा. शिंगणापूर), प्रियंका दायमा (रा. पुसद), वनिता खडसे (रा. पाथ्रट गोळे), पंडित कंडेल (रा. महागाव), वनिता मेश्राम (रा. मालखेड), प्रेमदास चव्हाण, चेतन छागाणी (रा. दारव्हा), सारिका भिडेकर (रा. बडनेरा), अश्विन जाधव (रा. पुसद), सिद्धार्थ धुळे (रा. पुसद), शालिनी गुजर, बाळकृष्ण काळे (रा. शेंद्री डोलारी), विजय पत्रे (रा. पुसद), तुषार भिडेकर (रा. बडनेरा), नरेश छांगाणी (रा. दारव्हा), वसंत वहाने (रा. दिघी कोल्हे), सुरेखा इंगळे (रा. पुसद), साक्षी उंबरकर (रा. पुसद) अशी जखमींची नावे आहेत.  यातील काहींना नांदगाव खंडेश्वर व नेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील १४ प्रवाशांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वाहक प्रेमदास चव्हाण यांच्यासह तिघे गंभीर जखमी असल्याचे सूत्रानी सांगितले. एमएच ४० वाय ५९२६ क्रमांकाची एसटी बस पुसदहून,अमरावतीकडे येत होती, तर एम.एच. १६ एवाय ९७६७ क्रमांकाचा ट्रक औरंगाबादहून नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला. चौफुलीवरून धिम्या गतीने जाणाऱ्या एसटीला भरधाव ट्रकने सुमारे पन्नास ते साठ फूट फरफटत नेले. या धडकेनंतरही चालकाने एसटीचे संतुलन कायम ठेवत ती रस्त्याच्या खाली सुरक्षित उतरविली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच ठाणेदार हेमंत ठाकरे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिवणी, शिंगणापूर व नांदगाव खंडेश्वर येथील बरेच सामाजिक कार्यकर्ते अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. अपघात घडवून आणणाऱ्या ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. 

रुग्णालयात गर्दीजिल्हा सामान्य रुग्णालयात एसटी अपघातातील जखमींना उपचारासाठी दुपारी १ च्या सुमारास आणले गेले. ही वार्ता कळताच त्यांच्या अमरावती येथील आप्तांनीही रुग्णालय गाठले. यामुळे या परिसरात एकच गर्दी होती. 

ग्रामस्थ आले मदतीला धावून बुधवारी दुपारी ११ वाजता अपघात घडल्याचे निदर्शनास येताच शिंगणापूर येथील ग्रामस्थ मदतीला धावले. पोलीस येण्यापूर्वी आटोकाट प्रयत्न करीत त्यांनी जखमींना एसटीबाहेर काढले. दरम्यान, काही जखमींना राजापेठ, तर तीन ते चार जणांना काँग्रेसनगर मार्गावरील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. चालक महमूद खान पठाण (५६) हेदेखील गंभीर जखमी झाले. ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा नोंदविण्यात आला. 

 

टॅग्स :Accidentअपघात