Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, दिवसभरात दोन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 21:17 IST2020-05-22T21:17:39+5:302020-05-22T21:17:59+5:30
अमरावती: जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दरदिवसाला वाढतच आहे. येथील कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या पाटीपुरा येथील एका ३० वर्षीय युवकाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.

Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, दिवसभरात दोन पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दरदिवसाला वाढतच आहे. येथील कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या पाटीपुरा येथील एका ३० वर्षीय युवकाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. मसानगंज येथील एक ५० वर्षीय महिला व लालखडी येथील एक १९ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४२ एवढी झाली आहे. पाटीपुºयातील युवकाच्या मृत्यूने कोरोनाने दगावलेल्यांची संख्या १४ झाली आहे. ५० जण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शहरात चार नवे कंटेनमेंट झोन घोषित
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारी शहरात नव्याने चार कंटेनमेंट झोन घोषित केले. यात वलगाव मार्गावरील मीठ कारखानच्या मागील बाजूस अलहिलाल कॉलनी, वलगाव मार्गावरील डी.एड. कॉलनी, हबीबनगर नंबर २ आणि रविनगरच्या मागील बाजूस असलेले वल्लभनगर यांचा समावेश आहे. या चारही झोनमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना अनावश्यक बाहेर जाता येणार नाही, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले. आतापर्यंत महानगरात २५ कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.
मसानगंज हॉटस्पॉट सील
मसागंज परिसरात कोरोना संक्रमिताची संख्या वेगाने वाढत आहे. हा परिसर महापालिका प्रशासनाने हॉटस्पॉट म्हणून घोषित केला आहे. परिणामी मसानगंज भागात येणारे चहुबाजुचे रस्ते, मार्ग सील करण्यात आले आहेत. बाहेरील व्यक्ती अथवा त्यांच्या वाहनांना प्रवेश मनाई आहे. या भागात आतापर्यंत २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.