माणिकपूर येथे वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:27 IST2019-02-28T18:27:20+5:302019-02-28T18:27:22+5:30
नजीकच्या माणिकपूर येथील सुकलू गोरी मोरोपे या ७५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.

माणिकपूर येथे वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
अमरावती : नजीकच्या माणिकपूर येथील सुकलू गोरी मोरोपे या ७५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघड झाली.
सुकलू मोरोपे हे माणिकपूर येथील संत्राउत्पादक शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते. तीन-चार वर्षांतील सततच्या नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. यंदा तीन लाखांचा मृगबहर अवघ्या ७० हजारांत विकावा लागल्याने ते विमनस्क झाले होते. आप्तेष्टांकडून विशिष्ट मुदतीवर घेतलेल्या उसणवारीचा परतावा कसा करायचा? त्यांना काय उत्तर द्यायचे? यावर्षी पाणीटंचाईत संत्राबागा सुकल्यास देणी कुठून फेडायची? या विवंचनेत त्यांनी हा कठोर निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.