Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या पाचवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:57 PM2020-04-11T17:57:28+5:302020-04-11T17:58:59+5:30

शनिवारी ६५ वर्षीय महिलेचा थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता पाच झाली आहे.

The number of corona positive in Amrava is five | Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या पाचवर

Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या पाचवर

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती मृताच्या आईलाही लागण५७ थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाने दगावलेल्या हाथीपुरा येथील ४५ वर्षीय युवकाची आई कोरोनाबाधित झाली आहे. यापूर्वी मृताचे दोन भाऊ व पत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. शनिवारी ६५ वर्षीय महिलेचा थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता पाच झाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून एकूण ३४३ थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २६२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर अद्याप ५७ नमुने प्रलंबित आहेत. याव्यतिरिक्त १९ नमुने रिजेक्ट करण्यात आले. त्यापैकी १२ नमुने पुन:तपासणीसाठी पाठविल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिली. हाथीपुरा भागातील युवकाचा ३ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर परिसरातील दोन किमी परिसर प्रशासनाने बफर झोन घोषित करून बाधिताच्या संपकार्तील २४ व्यक्तींना कोविड-१९ रुग्णालयात क्वारंटाइन केले. मृताचे दोन भाऊ व पत्नी यांचा अहवाल मंगळवारी आणि मृताच्या आईचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. या बाधितांना आता कोविड-१९ रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये हलविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मृत कोरोनाबाधितांच्या आईचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आलेला आहे. जिल्ह्यात मृतासह एकूण पाच व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. हाथीपुरा परिसरात महापालिकेच्या आरोग्य पथकाद्वारे भेटी देणे सुरू आहेत.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती

Web Title: The number of corona positive in Amrava is five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.