शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

-आता प्रोटोकॉलनुसार कारोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

सध्या सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत आहे. यासंदर्भाने चाचण्या करण्यासाठी ‘आयसीएमआर’ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना व संक्रमित रुग्णांचे स्वरुप पाहता चाचण्यांसाठी आता ‘अल्गोरिदम’ तयार करण्यात आलेले आहे. या सुचनेनुसार आता कोरोना संसर्गाचे चाचण्या करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतीन गटात विभागणी : हायरिस्क, फॉरेन रिटर्नसाठी आरटी-पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात एकाच रुग्णाच्या दोन ते तीन चाचण्या करण्यात येत असल्याने लॅबवरील ताण व शासनावरील आर्थिक भार वाढतो आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार आता प्रत्येक व्यक्तीचा प्रोटोकॉल निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसारच चाचण्या कराव्यात. अधिकच्या चाचण्या करु नयेत, असे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
सध्या सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत आहे. यासंदर्भाने चाचण्या करण्यासाठी ‘आयसीएमआर’ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना व संक्रमित रुग्णांचे स्वरुप पाहता चाचण्यांसाठी आता ‘अल्गोरिदम’ तयार करण्यात आलेले आहे. या सुचनेनुसार आता कोरोना संसर्गाचे चाचण्या करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात येणार आहे.
मनोरुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांना एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. त्यानंतर अ‍ॅन्टीजन चाचणी करावी आणि त्यानुसार आयसोलेशन वॉर्डमध्ये किंवा रुग्णालयातील संबंधित वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अश्या सूचना आहेत. याशिवाय तुरुंगात कैदी दाखल झाल्यानंतर एक आठवडा क्वारंटाईन करण्यात यावे. त्यानंतर अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यात यावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार आयसोलेशन, कोविड रुग्णालयात संदर्भीत करणे याविषयीचा निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना आहेत.

अशी आहे चाचण्यांची विभागणी
रॅपीड अ‍ॅन्टीजेन : ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणीची आवश्यकता आहे. अशांची अ‍ॅन्टीजन चाचणी करण्यात यावी. आता अशा रुग्णाबाबत अर्धा तासांत निर्णय घेता येणार आहे.
आरटी-पीसीआर : ही चाचणी 'रॅपीड अ‍ॅन्टीजेन'चा अहवाल नकारात्मक आला असेल किंवा लक्षणे असणारे रुग्ण, पॉझिटिव्ह व्यक्तींचा हायरिस्क कॉन्टॅक्ट आणि परदेशातून येणाऱ्या व्यक्तींचीच करण्यात यावी.
ट्रुनेट : ‘ब्रॉट डेड’ व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, ईमर्जन्सी ऑपरेशनचे रुग्ण, आदींची ‘ट्रुनेट चाचणी करण्यात यावी, असे निर्देश आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या