शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आता वाहनांकरिता वेगमर्यादा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:01 IST

याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १०० किलोमीटर प्रतितास व घाटात ५० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा.

ठळक मुद्देवाहतूक पोलीस विभागाकडून अधिसूचना : प्रत्येक मार्गावर राहणार लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सुमारे ३० टक्के प्राणांतिक अपघात हे वाहनचालकांनी भरधाव वेगाने वाहन चालविल्याने होतात. त्यामुळे वाहनांना वेगमर्यादा घालून देणारी अधिसूचना वाहतूक पोलीस विभागाने जारी केली आहे. रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाट रस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते, चढउतार आदी बाबींचा विचार करून महत्तम वेग मर्यादा निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १०० किलोमीटर प्रतितास व घाटात ५० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा. चारहून अधिक मार्गिका व विभाजक असलेल्या महामार्गावर समतल भागात ९० व घाटातून ५० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा सांभाळावी. या वाहनांनी महापालिकेच्या क्षेत्रातील द्रुतगती मार्गावर व सहा मार्गिका असलेल्या विभाजित रस्त्यावर समतल भागात ८० व शहरी क्षेत्रात घाट असल्यास ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा ओलांडू नये. राष्ट्रीय किंवा राज्य दोन किंवा अधिक मार्गिका असलेल्या महामार्गावर विभाजक नसल्यास किंवा महानगरी क्षेत्रातील विभाजित रस्ते असल्यास समतल भागात ७० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगाची मर्यादा ठेवावी. नगरपालिका क्षेत्रात समतलमधील मर्यादा ६० व घाटातील ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा निश्चित केली आहे.मालमोटारी व नऊ प्रवासी वाहनांसाठी वेग मर्यादामालमोटारी तसेच वाहनचालकासह नऊ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांंची वाहतूक करणाºया वाहनांसाठी वेगमर्यादा जवळपास सारखी आहे. अशा वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावर समतलमध्ये ८० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा. चारहून अधिक मार्गिका व विभाजक असलेल्या महामार्गावरही हीच वेगमर्यादा असेल. महानगरी क्षेत्रातील द्रुतगती सहा मार्गिका असलेल्या विभाजित रस्त्यावर समतलमध्ये ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर दोन किंवा अधिक मार्गिकेच्या विभाजक नसलेल्या किंवा महानगरी क्षेत्रातील विभाजित रस्त्यात समतलमध्ये ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितासची मर्यादा आहे. नऊ प्रवासी वाहनांनी नगरपालिका क्षेत्रात समतलमध्ये ५० व घाटात ३० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा सांभाळावी. नगरपालिका क्षेत्रात मालमोटारींना समतलमध्ये ४० व घाटात ३० किलोमीटर प्रतितास मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे.दुचाकी वाहनेदुचाकी वाहनांना चार मार्गिका विभाजित रस्त्यावर समतल रस्त्यावर प्रतितास ७० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. महानगरी सहा किंवा चार मार्गिका विभाजित द्रुतगती रस्त्यावर तसेच दोनहून अधिक जास्त मार्गिकेच्या राष्ट्रीय, राज्य महामार्गावर दुचाक्या समतलमध्ये प्रतितास ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील.

 

टॅग्स :highwayमहामार्ग