शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वापराच्या जागाधारकांना नोटीस

By admin | Updated: March 9, 2015 00:41 IST

नझूल आणि अभिन्यासच्या जागा वापराचे मूळ स्वरुप न ठेवता ते परस्पर बदलवून जागेचा वापर

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : दीड कोटी दंड वसुलीचे 'लक्ष्य'अमरावती : नझूल आणि अभिन्यासच्या जागा वापराचे मूळ स्वरुप न ठेवता ते परस्पर बदलवून जागेचा वापर करणाऱ्या मालमत्तेची शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरावती तहसील अंतर्गत ९८ प्रकरणे निदर्शनास आली असून या सर्व मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आठ दिवसांच्या आत दंड भरुन ते नियमानुसार न केल्यास या मालमत्ता सील केल्या जातील, असे नोटीसमध्ये नमूद आहे.महसूल विभागाने नझूल आणि अभिन्यासातील जमिनीला लक्ष्य केले आहे. बहुतांश नागरिकांनी कृषक जमिनीवर हॉटेल्स, मॉल्स, ढाबे, संकुल, मंगल कार्यालये, दवाखाने साकारले आहेत. ही बाब नियमांना विसंगत आहे. अनेकांनी कृषक जमिनीचा परस्पर वापर करुन शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिणामी अनधिकृत वापराच्या जागेची शोधमोहीम घेत त्या अधिकृत करुन घेण्यासाठी दंडात्मक कारवाईचा नियम लागू करण्यात आले आहे. जमीन महसूल अधिनियमानुसार अनधिकृत वापराच्या जमिनी अधिकृत करण्यासाठी ४० टक्के दंडाची आकारणी केली जाते. दंड वसुलीचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहेत. कृषक जमिनींच्या वाणिज्य वापरात बदल झाल्यास दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी मालमत्ताधारकांना नोटीस बजावून दंड भरण्यास कळविण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यानंतर आठ दिवसात ४० टक्के दंडाची रक्कम भरुन मालमत्ता अधिकृत करुन घेणे अपेक्षित आहे. अन्यथा, या मालमत्तांना टाळे लावले जाईल. नझूल क्षेत्रातील अनधिकृत जागा वापराची कार्यवाही उपविभागीय अधिकारी तर अभिन्यासातील अनधिकृत जमिनीच्या वापराबाबतची कारवाई तहसीलदार करतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आतापर्यंत ९८ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात नझूलला ६० लाख तर अभिन्यासातील मालमत्तांना ९० लाख दंड वसुलीचे लक्ष्य दिले आहे. त्यानंतर महसूल विभाग या मालमत्तांवर बोझा चढवून ती ताब्यात घेण्याची कारवाई करेल. त्यामुळे कृषक जमिनींचा परस्पर वाणिज्य वापर करणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.९८ मालमत्ताधारकांना नोटीसअमरावती तहसीलअंतर्गत जागांचा परस्पर अनधिकृत वापर करणाऱ्या ९८ मालमत्ताधारकांना दंडात्मक कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली आहेत. यात मॉल्स, हॉटेल्स, संकुल, मंगल कार्यालये, दवाखाने, शोरुम, कापडाची बाजारपेठ, कारखाने आदींचा समावेश आहे.जमिनींचा परस्पर वापर करता येत नाही. महसूल अधिनियमानुसार कृषक जमीन अकृषक करुन वापर करावा लागतो. मात्र, काहींनी परवानगी न घेता जमिनीचा वाणिज्य वापर करणे सुरु केले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत जागा वापराची शोधमोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. सदर मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.- सुरेश बगळे, तहसलीदार, अमरावती.